Sanjay Raut Criticized Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेणार आहेत. मात्र, त्यातून काहीही गंभीर माहिती येणार नाही. कारण या प्रकरणातील सर्व साटेलोटे आधीच उघड झाले असून, त्याची लक्तरे अगदी विधिमंडळापर्यंत आहेत, असा दावा शिवसेना प्रवक्ते दादा भुसे यांनी केला. (Drug mafia Lalit Patil have a relation even in Legislative Assembly)
शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचे थेट संबंध नाहीत का?, ड्रगमाफिया ललित पाटील याचे संबंध नाहीत का?, असा सवाल त्यांनी केला.
शिवसेना ड्रग्ज प्रकरणावर शिवसेनेकडून आज शहरात मोर्चा काढण्यात येत आहे. हा मोर्चा सुरू होण्याआधी प्रवक्ते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाना साधला. याबाबत त्यांनी पत्रकारांशी बोलताना यापूर्वी केलेल्या आरोपांचा पुनरुच्चार केला आहे.
राऊत म्हणाले, कदाचित देवेंद्र फडणवीस भांग पित नसतील. मात्र, भांगेची झिंग त्यांना येत असावी; अन्यथा सध्या ड्रग्ज प्रकरणावर ते जी विधाने करीत आहेत, शिवसेनेवर आरोप करीत आहेत, ते त्यांनी केला नसता. असे नशेबाज लोक आजूबाजूला असल्याने त्यांच्या तोंडाचा वास येतो आहे. त्याचा परिणाम होतच असतो.
राऊत म्हणाले, राजकीय आणि पोलिसांच्या आश्रयाशिवाय एवढे मोठे ड्रग्ज प्रकरण आरामात व कोणतीही बाधा न येता सुरूच राहिले नसते. त्यात कोट्यवधींची उलाढाल होत होती. त्याचे लाभार्थी कोण?. या प्रकरणाची धागेदोरे, व्यवसाय गुजरात व मध्य प्रदेशात पसरला आहे. त्याला फडणवीसांचा पाठिंबा आहे का?.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.