Raksha Khadse in BJP Meeting
Raksha Khadse in BJP Meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

खडसे समर्थक भाजपच्या बैठकीत रडू लागल्याने रक्षा खडसेंची धावपळ!

Sampat Devgire

रावेर : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या समर्थक आहोत मात्र आता ना पद मिळतेय, ना विकासासाठी निधी. (Devolopment Fund) आम्ची कोंडी केली जात असल्याचे सांगत पंचयात समिती सदस्या योगिता वानखेडे (Yogita Wankhede) आज खासदार रक्षा खडसे यांच्यासमोरच भर सभेत रडल्या. (Cry) त्यामुळे सगळ्यांचा गोंधळ उडाला.

Eknath Khadse

यावेळी त्या म्हणाल्या, आपण माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे समर्थक आहोत, आपल्याला भारतीय जनता पक्षातर्फे येथील पंचायत समितीच्या उपसभापतिपदाची संधी देण्याचे पूर्वी ठरले होते. तरी देखील ती दिली जात नाही, ती दिली जावी, अशी भावपूर्ण विनंती त्यांनी केली.

येथील पंचायत समितीच्या सदस्या योगिता वानखेडे यांनी शनिवारी खासदार रक्षा खडसे आणि जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्यासमोर पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना विनंती केली. या वेळी तालुक्‍यातील सर्वच ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते, हे विशेष! मात्र, या विषयावर इथे पत्रकारांसमोर चर्चा न करता पक्ष कार्यालयात करू, असे सांगून हा विषय थांबविण्यात आला. पदापासून आपल्याला वंचित ठेवले जात असल्याची व्यथा मांडताना श्रीमती वानखेडे यांना रडूही कोसळले होते.

पंचायत समितीच्या सत्तावाटप सूत्राप्रमाणे पक्षाचे तत्कालीन नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे आणि आमदार हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत पाचही वर्षांच्या सभापती आणि उपसभापतिपदाचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता. पण नंतर (कै.) जावळे यांचे निधन झाले तर ज्येष्ठ नेते श्री. खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. सत्तावाटप सूत्रानुसार अन्य सर्व सदस्यांना संधी दिली गेली म्हणून श्रीमती वानखेडे या त्यांना उपसभापतिपद मिळण्यासाठी सतत पाठपुरावा करीत होत्या. याबाबतचा निर्णय पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार सुरेश भोळे हे घेतील, असे सांगून तालुक्यातील पक्षनेत्यांनी हा चेंडू जिल्हा नेत्यांकडे टोलविला होता. मध्यंतरी तामसवाडी (ओमकारेश्वर) येथे पक्षाच्या झालेल्या कार्यक्रमातही सुरवातीला श्रीमती वानखेडे यांना व्यासपीठावर स्थान मिळालेले नव्हते आणि उपसभापतिपदाबाबत चर्चाही झाली नसल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.

अखेर शनिवारी सायंकाळी पक्षाच्या कार्यक्रमानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयाचे उदघाटन करताना श्रीमती वानखेडे यांनी आपली व्यथा सर्वांसमोर मांडली व भावनांना मोकळी वाट करून दिली. १५ ऑगस्टपासून आपल्याला उपसभापतिपदाची संधी मिळायला हवी होती, परंतु पक्षातील सर्वजण आपल्याला ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे समर्थक मानतात म्हणून संधी मिळत नाही, आपले म्हणणे कोणी ऐकून घेत नसल्याचे त्यांनी खासदार खडसे यांना सांगितले. याबाबत पक्षाचे तालुकाध्यक्ष राजन लासूरकर यांना विचारले असता, खासदार खडसे यांनी श्रीमती वानखेडे यांचे म्हणणे आस्थेवाईकपणे ऐकून घेतले, पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवा, पक्ष पुढे तुम्हाला संधी देईल, सध्या पद देण्यात काही अडचणी आहेत, वाटल्यास तुम्ही ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांना भेटा, असेही त्यांना खासदार खडसे यांनी सांगितल्याचे श्री. लासूरकर यांनी सांगितले.

पक्ष निर्णयावर ठाम

दरम्यान, श्रीमती वानखेडे यांच्या भावनाविवश होऊन व्यथा मांडल्याची चर्चा सर्वत्र चर्चेचा विषय झाली आहे. पंचायत समितीच्या उपसभापती धनश्री सावळे यांनाच या पदावर कायम ठेवण्याचा आणि श्रीमती वानखेडे यांना संधी न देण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT