घाबरला असाल तर भाजपमध्ये जा, तीथे गेले की सर्व माफ!

केंद्र सरकार विरोधात बोलाल तर ऊस जसा चरकात टाकतात, तसे चरकात टाकून तुमचा तुमचा रस काढतील.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : जे घाबरले त्यांनी भारतीय जनता पक्षात जावे. तीथे गेले की सर्व काही माफ. सर्व आरोप, चौकशी बंद व प्रतिमा साफ. विरोधात बोलाल तर ऊस जसा चरकात टाकतात, तसे चरकात टाकून तुमचा अगदी रस काढतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले.

जळगाव येथे ओबीसी परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, आपण आज येथे ओबीसींच्या आरक्षणासाठी जमलो आहोत. त्यात अनेक विषयांची चर्चा झाली. विविध सहकारी अगदी जोर-जोरात बोलले. पोटतिडकीने त्यांनी प्रश्न मांडले. मात्र सावध रहा बाबांनो. उद्या इनकमटॅक्स वाला घरी नाही आला म्हणजे परवडला. कारण जो जो ओबीसींच्या या कामात येईल, त्याला जसा ऊस चरकात टाकून रस बाहेर काढतात, तसे त्यांचे रस काढायचे काम असते. आता सध्या खडसे साहेबांच्या सुद्धा पाठीमागे लागलेले आहेत.

Chhagan Bhujbal
राज्य सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल !

ते पुढे म्हणाले, भाजपच्या विरुद्ध जेव्हा आपण एखादा विषय घेतो. तेव्हा त्यांचं अगदी प्ल्रनींग असतं. चार्तुवर्णातून सुरु झालेला मनुवाद, अमुक, तमुक, हे, ते सर्व काही गुलाबराव पाटील यांनी सगळे सांगितलच आहे. त्यामुळे सावध रहा. जे घाबरले असतील त्यांनी ताबडतोब बीजेपीमध्ये जायचे. तिकडे गेले की, सब माफ.

Chhagan Bhujbal
पोलिस तपासताहेत, ‘ओ शेठ’ कुणाचे? नाशिकचे... की पुण्याचे?

यावेळी त्यांनी आमदार कपिल पाटील यांनी आपली जीव वाचवला याची आठवण सांगितली. ते म्हणाले, या माणसाने माझा जीव वाचवला आहे. तुम्हाला हे माहिती आहे काय?. जेव्हा मला जेलमध्ये टाकले. तेव्हा दोन-तीन वेळा तर प्रकडती फार सिरीयस झाली. प्रचंड सिरीयस झालो. त्यांच्यासाठी ती अतिशय सोपी गोष्ट असते. जेलमध्ये देखील ती सोपी गोष्ट असते. कोणालाही जेलमध्ये टाकायचे, तो आजारी पडला की, त्याच्याकडे बघायचे नाही. मग एक दिवस तो गेला की, म्हणायचे तो हार्ट अटॅकने गेला. संपला विषय.

श्री. भुजबळ म्हणाले, पण जेव्हा कपिल पाटील यांना बे कळले की, भुजबळ एकदम सिरीयस आहेत. त्यावेळेला हे कपिल पाटील विधानमंडळात उभे राहिले. त्यांनी सांगितले, तुम्ही भुजबळांना काय वागणूक देत आहात. दवाखान्यात नेत नाही. दवाखान्यात नेले, तर कुठे तरी लांब रांगेत उभे करता. त्यांना मारून टाकणार की काय? त्यामुळे कपिल पाटील यांचा शब्द मी मोडू शकत नाही.

त्यांनी सांगितले की, भाजपविरोधात कोणी बोलले, तर केंद्रीय यंत्रणांचा वापर करून लोकांना गप्प केले जाते. ईडी, सीबीआय किंवा आयकर विभागाद्वारे चौकशीचा ससेमीरा लावला जातो. मात्र, ‘सत्य परेशान हो सकता है, पराजित नही,’. आपण देशात एका विशिष्ट उद्देशाने काम करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात एकत्रित उठाव केला पाहिजे.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com