Nashik Crime News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : गिरीश महाजनांसमोरच भावा-बहिणीचा आत्मदहनाचा प्रयत्न: पोलिसांमुळे थोडक्यात बचावले...

सरकारनामा ब्यूरो

Nashik News : सोलापुरात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री हसन मुश्रीफांसमोरच एका तरुणाने रॉकेल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याला काही तास उलटत नाही तर नाशिकमध्येही असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजनांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या बहिण-भावाला पोलिसांनी वेळीच रोखले आणि पुढचा अनर्थ टळला.

नाशिक मधील भूमी अभिलेख विभागाच्या गलथान कारभारामुळे वडिलोपार्जित जमीन गमवण्याची वेळ आल्यामुळे संबंधित विभागाकडून न्याय मिळाला नाही. म्हणून चांदवड तालुक्यातील योगेश खताळ व त्याची बहीण अश्विनी खताळ यांनी गेल्या 40 दिवसापासून नाशिक महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. परंतु अद्यापही त्यांना न्याय मिळत नसल्याने अखेर या दोघा भाऊ बहिणींनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी येथील महसूल आयुक्त कार्यालयासमोर मंत्री गिरीश महाजनांसमोरच आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्या अगोदरच या दोघा भाऊ बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

योगेश खताळ व त्याची बहीण अश्विनी हे दोघे गेल्या 40 दिवसापासून येथील महसूल आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. परंतु 40 दिवस उपोषणाला बसून सुद्धा कोणी अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या दोघा भाऊ बहिणीने आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी महसूल आयुक्त कार्यालयात मंत्री गिरीश महाजन हे झेंडावंदन करण्यात येणार असल्याने त्यांच्यासमोरच आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

सोलापुरात नेमकं काय घडलं ?

सोलापुरात ध्वजारोहणानंतर मंत्री हसन मुश्रीफ भाषण करत असतानाच एका तरुणाने रॉकेल पिऊन आणि अंगावर ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर पाटील असे या तरुणाचे नाव आहे. रॉकेल प्राशन केल्यामुळे तरुणाला भोवळ आली. पण तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्याला जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकारामुळे अधिकाऱ्यांचीही चांगलीच धावपळ झाली.

ज्ञानेश्वर हा दक्षिण सोलापूरमधील दोड्डी गावातील शेतकरी तरुण आहे. त्याने एका बँकेकडून कर्ज घेतले होते व टप्प्याटप्प्याने ते फेडले. पण तरीही त्याच्या शेतीचा सातबारा कोरा झाला नाही. कर्ज फेडूनही शेतीवरील बोजा कायम असल्याने सरकार दरबारी हेलपाटे मारावे लागत आहेत. पण तरीही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. या विवंचनेतूनच ज्ञानेश्वरने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT