Shivsena leader Subhash Desai Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Subhash Desai News; दाओसमधील करार म्हणजे मुख्यमंत्री शिंदेंची धूळफेक!

सुभाष देसाई यांचा आरोप; उद्योग महाराष्ट्रातील, करार मात्र स्वित्झर्लंडला जाऊन केले

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) राज्यातील (Maharashtra Government) सरकार हे दिखाऊ सरकार आहे, दाओस (स्वित्झर्लंड) येथे कोट्यवधींचे करार झाल्याचा केवळ देखावा करण्यात येत असून, जनतेची धूळफेक करण्यात आली आहे. करार स्वित्झर्लंडला झाल्याचे दाखवले जात असले तरी बहुतांश उद्योग महाराष्ट्रातीलच आहे, ते करार मंत्रालयात बसूनही करता आले असते, असा दावा शिवसेना नेते (Shivsena) माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केला. (Maharashtra Government could have sign investment agreements in Mantralaya)

नाशिक पदवीधर मतदारसंघातील शिवसेना पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या नियोजन बैठकीत त्यांनी ही टीका केली. यावेळी श्री. देसाई यांनी महाराष्ट्रातील तसेच आंध्र प्रदेशातील उद्योजकांशी झालेले करार म्हणजे महाराष्ट्राची फसवणूक म्हटली पाहिजे. सरकारने असे का केले याचा खुलासा करावा.

श्री. देसाई यांनी विद्यमान सरकारचा ‘मिंधे सरकार’ असा उल्लेख करीत, दाओस येथे लाखो-कोटींचे करार झाल्याचा दावा हा राज्यातील नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक आहे. जे करार झाले ती विदेशी गुंतवणूक कमी आणि राज्यातील उद्योगसमूहांची अधिक आहे. हे सगळे करार मंत्रालयात बसूनही करता येणे शक्य होते. दाओसला जायची गरज काय होती? असा प्रश्न श्री. देसाई यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले, ‘‘ज्या उद्योग समूहाशी करार झाले, त्यांची माहिती घेतली तर पुण्यातील बडवे इंजिनिअरिंग, जालना येथील राजोरी स्टील, मुंबईतील बाळासाहेब दराडे अशा अनेक महाराष्ट्रातीलच उद्योगसमूहांचा समावेश आहे. करारच करायचे होते, तर तिथे जायची काय गरज होती, मंत्रालयात बसूनही हे करार करता आले असते, असाही टोलाही त्यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT