Jantar Mantar Wrestlers Protest : क्रिडा मंत्र्यांच्या आश्वासनानंतर खेळाडूंचे आंदोलन मागे: पण...

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला पहलवानांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते
Jantar Mantar Wrestlers Protest
Jantar Mantar Wrestlers Protest
Published on
Updated on

Jantar Mantar Wrestlers Protest केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग सिंह ठाकुर यांच्यासोबत सात तास चाललेल्या बैठकीनंतर खेळाडूंनी राजधानी दिल्लीतील जंतरमंतर मैदानातील आंदोनल अखेर आंदोलन मागे घेतले.

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला पहलवानांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप करत बृजभूषण शरणसिंहला हटवण्याची आणि महासंघ बरखास्त करण्याची मागणीसाठी केली होती. यासाठी आंतराराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर मैदानात १८ जानेवारीपासून धरणे आंदोलन करत होते.

दरम्यान, बृजभुषण सिंह यांच्यावरील आरोपांप्रकरणी भारतीय ऑलम्पिक संघाने 7 सदस्यीय समितीची घोषणा केली आहे. ही समिती बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपासंदर्भात चार आठवड्यांच्या आत चौकशी करणार असून या समितीत मैरी कॉम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि कायदा तज्ज्ञांचा समावेश असेल. असेही सांगण्यात आले आहे.

Jantar Mantar Wrestlers Protest
BJP-NCP Politics : पुणे भाजपात इन्कमिंग सुरू होणार; काँग्रेस-राष्ट्रवादीतील 25-30 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर !

तोपर्यंत बृजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघापासून स्वतःला लांब राहतील आणि चौकशीत सहकार्य करतील. तोपर्यंत कुस्ती महासंघांचे काम एक समिती करेल, असेही ठाकुर यांनी सांगितले आहे. दरम्यान, खेळाडूंच्या समस्या जाणून घेण्यासाठी अनुराग ठाकूर यांनी १९ जानेवारीलाही या सर्व खेळाडूंना जेवणासाठी आमंत्रित केलं होतं. पण, या डीनर डिप्लोमसीत कुठलाही तोडगा निघाला नाही. आता क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 72 तासांचा वेळ दिला आहे. तोपर्यंत बृजभूषण शरण सिंह यांना वेळ देणे आवश्यक असल्याचंही सरकारचं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com