Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीला अर्ज दाखल करून ऐनवेळी निवडणुकीत माघार घेतलेल्या एमआयएम पक्षाने नगर जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याच्या तयारी करत आहे.
एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील त्यानुसार कार्यवाहीचा आदेश दिला. जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी आणि पक्ष संघटना हा आदेश घेऊनच कामाला लागलेत. एमआयएम पूर्ण ताकदीने विधानसभा निवडणुकीत उतरत असल्याने नगर जिल्ह्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमधील इच्छुकांमध्ये धडकी भरलीय.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) इथं एमआयएम पक्षाची बैठक झाली. राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आपपाल्या कार्यक्षेत्रातील अहवाल घेऊन या बैठकीला दाखल झाले होते. या बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघाचा अहवाल जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी सादर केला. नगर जिल्ह्यातील 12 जागा लढवण्याची तयारी परवेज अशरफी यांनी दर्शवली. लोकसभा निवडणुकीला नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात दाखल केलेला अर्ज आणि त्यानंतर त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांचा दाखल परवेज अशरफी यांनी दिला.
तसेच, नगर जिल्ह्यात गेल्या वर्ष आणि दीड वर्षांपासून सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम वादामुळे अल्पसंख्याक समाज नाराज आहे. मुस्लिम समाजासह इतर अल्पसंख्याक समाजाला अशा परिस्थितीत एमआयएम (MIM) पक्षाने मोठी मदत केली आहे. पीडितांसाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे पक्ष आणि संघटनेचे नाव जिल्ह्यातील ग्रामीण भागापर्यंत पोचले आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीला होईल, असा दावा सांगणार अहवाल जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी सादर केला. असदुद्दीन ओवैसी यांनी या दाव्यानुसार पक्ष संघटनेला विधानसभा मतदारसंघानिहाय बांधणीचा आदेश केला.
पक्षाध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचा हा आदेशच घेऊन आलो असून, त्यानुसार नगर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केल्याचे जिल्हाध्यक्ष परवेज अशरफी यांनी सांगितले. नगरची जनता ही जातीवादी पक्षाला वैतागली आहे. चुकीचा होत असताना कोणताही आवाज न उचलणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षांला देखील वैतागली आहे. जनता पर्याय शोधतेय आणि तो एमआयएम होऊ शकतो. लवकरच नगर शहरासह जिल्ह्यातील 12 विधानसभा क्षेत्राचे इच्छुक उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींना देवू, असे परवेज अशरफी यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.