Deepika Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलवा

Sampat Devgire

सटाणा : अतिवृष्टी (Heavy Rain) आणि ढगफुटीमुळे (Cloudburst) खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून, परतीच्या पावसामुळे रब्बीचा हंगामही (Crop sesion) धोक्यात आला आहे. शासनाने (State Government) शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी विशेष अधिवेशन (Special session) बोलवावे अशी मागणी बागलाणच्या माजी आमदार व राज्य महिला आयोगाच्या (Womens commission) सदस्या दीपिका चव्हाण (Deepika chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन केली. (Ex MLA deepika Shinde deemands wet drought announcement)

यावेळी बागलाण तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी एक लाख रुपयांचे अनुदान द्यावे, पिकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली.

श्रीमती चव्हाण म्हणाल्या, मुंबईत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेटली. बागलाण तालुक्यातील शेतीच्या नुकसानीसंदर्भात चर्चा केली आणि निवेदन दिले. बागलाण तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात सातत्याने झालेल्या ढगफुटीसदृश्‍य अतिवृष्टीत शेतकऱ्यांची अत्यंत दैनावस्था झाली आहे.

हातातोंडाशी आलेली पिके पावसामुळे सडून गेली आहेत. फळबागांचेही प्रचंड नुकसान झाले असून, बळीराजाच्या हाती दोन पैसेही शिल्लक राहिलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच गेली असून, बहुतांश शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले गेले आहेत. द्राक्ष, डाळिंब पिकांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारत असतानाच नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे कंबरडे मोडले आहे.

शेतकऱ्यांना शासनाने आधार द्यावा. पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले जात आहे. कृषीप्रधान महाराष्ट्रात विमा कंपन्यांकडून बळीराजाची चालवलेली क्रुर थट्टा थांबवावी. तालुक्यात दोनशेपेक्षा जास्त पटीने पाऊस झाल्याने तातडीने ओला दुष्काळ जाहिर करावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहेत.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT