Sujay Vikhe News
Sujay Vikhe News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujay Vikhe News: बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला! लकेंच्या बालेकिल्ल्यात जावून खासदार विखेंनी सुनावलं

सरकारनामा ब्यूरो

Ahmednagar News : राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीचा प्रचार सध्या सुरू असून राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

याच पार्श्वभूमीवर पारनेरमध्ये आयोजित जनसेवा पॅनलच्या प्रचार सभेत बोलताना खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार निलेश लंके आणि माजी आमदार विजय औटी यांच्यावर त्यांच्या बालेकिल्यात जाऊन जोरदार प्रहार केला आहे.

सुजय विखे पाटील म्हणाले, ''उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पवारांच्या दावणीला बांधली. आता इकडे विजय औटींनी देखील येथील शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली आहे. ज्यांना कधी काळी चोर आणि गुंड म्हणत होते, त्यांना आता लोकनेते म्हणण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे'', असा घणाघात सुजय विखे यांनी विजय औटी आणि निलेश लंके यांच्यावर केला.

''चोर, गुंड, दरोडेखोर म्हणणाऱ्यांची युती एका रात्रीत झालेली नाही. याबाबतची खलबतं गेल्या सहा महिन्यांपासून सुरू होती. हा संघर्ष गरीब लोकांसाठी उभा केला आहे. तालुक्याचा विकास गेल्या तीन वर्षात वाळू तस्कर, गुंड यांच्या दावणीला बांधला होता. पण तालुक्याचा विकास जनतेपर्यंत आणण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू'', असं सुजय विखे म्हणाले.

दरम्यान, ''आम्ही सत्तेत आल्यानंतर येथे जी दहशत होती तिचा बीमोड करण्याचं काम केलं. आता या तालुक्यातील जनतेला विचार करण्याची वेळ आलीय. त्यांनी तुमच्या डोळ्यात अश्रू आणले त्यांच्यासोबत जायचं की जे तुमचे भविष्य घडविण्यासाठी मेहनत घेत आहेत त्यांच्यासोबत जायचं, हे आता तुम्हीच ठरवा, असंही ते यावेळी म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT