APMC Election : हुकूमशाहीच्या विरोधात एकवटले शेतकरी, प्रस्थापितांच्या विरोधात थोपटले दंड !

Farmers : शेतकऱ्यांनी किसान विकास परिवर्तन पॅनलचे उमेदवार उभे केले.
Amgaon APMC
Amgaon APMCSarkarnama
Published on
Updated on

Gondia District APMC Election : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत रणशिंग फुंकून शेतकऱ्यांनी किसान विकास परिवर्तन पॅनलचे उमेदवार उभे केले. यातून राष्ट्रवादी व भाजप यांच्याविरुद्ध आव्हान उभे केले आहे. ३० वर्षांत सत्तेचा हुकूमशाहीची वापर करून बाजार समितीचे कसे वाटोळे कसे केले, याचा पाढाच किसान विकास परिवर्तन पॅनलने वाचला. (A challenge has been raised against NCP and BJP)

केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी योजनांच्या माध्यमातून त्यांना विकासाकडे घेऊन जाण्याचा मार्ग निर्माण करून दिला. यात गोंदिया जिल्ह्यातील आमगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आर्थिक उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. परंतु, शेतकऱ्यांना आर्थिक मदत आणि विकास कामे न करता काहींनी सर्व नियम पायदळी तुडवले आहेत.

स्वतःचा स्वार्थ साधून केवळ मलिदा लाटणाऱ्या नेत्यांनी (Political Leaders) बाजार समितीचा विकास केला नाही. शेतकरी संकटात असतानाही हे लोक मदत करत नाहीत. शेतकऱ्यांना त्यांचे धान पुंजाने, पशुचारा व गोठे जळीत परिस्थितीत त्यांच्या मदतीला धावून जाण्याचे सौजन्य माजी पदाधिकारी व संचालकांनी आजवर दाखवले नाही. बाजार समितीत येणारे शेतकरी, अडते व मजुरांच्या हिताचे कार्य शून्य असल्याचा आरोप किसान विकास परिवर्तन पॅनलतर्फे करण्यात आला.

आरोग्य तपासणी, विमा यासह शिवभोजन, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले नाही. ग्रामीण भागातून धान्य विक्रीसाठी येणारा शेतकरी बाजार समितीत अनेकदा उघड्यावर रात्र काढतो. पण त्याला साधी राहण्याची सोय नाही. आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना धान्य पीक, भाजीपाला व इतर पीक घेण्यासाठी कधी प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन दिले नाही. शेती प्रशिक्षण, बाजारपेठ, आंतरराष्ट्रीय निर्यात, व्यावसायिक मार्गदर्शन इतक्या वर्षात कधी झाले याचे चिंतन करण्याची वेळ आली आहे.

Amgaon APMC
APMC Election : ...म्हणून महाविकास आघाडीचे नेते म्हणतात, आता बाजार समित्या आमच्याच !

बाजार समिती (APMC) शेतकऱ्यांची पण स्वार्थी नेत्यांमुळे मात्र शेतकरीच (Farmers) या ठिकाणी बळी ठरला आहे. योजनांचा लाभ मात्र काही व्यापारी नेत्यांनी उचलून शेतकऱ्यांचा माल स्वत:च्या घशात घातला आहे. यामुळे शेतकरी पुत्रांना रोजगारापासून वंचित राहावे लागले. मागील ३० वर्षांपासून बाजार समितीच्या माजी पदाधिकारी व संचालकांनी हुकूमशाहीची सत्ता गाजवली आहे. सामान्य शेतकऱ्यांना डावलून काही व्यापाऱ्यांचे भले करण्यासाठी सत्ता काबीज करताना पुन्हा अभद्र युती करून सामान्य शेतकऱ्यांना उमेदवारी दिली नाही.

किसान विकास परिवर्तन पॅनलचे सेवकराम ब्राह्मणकर, बंसीधर अग्रवाल, यशवंत मानकर, संजय बहेकार, गुड्डा गहरवार, शंभूदयाल अग्रीका, मेघश्याम मेंढे, इसुलाल भालेकर आदींनी प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटले आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com