Cantonment Board Appointments Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Deolali Cantonment Politics : देवळालीच्या प्रीतम आढावसह पुण्याच्या 'त्या' दोघांना भाजपचे 'न्यू इयर गिफ्ट'

Sampat Devgire

Deolali Cantonment Politics :

Nashik : केंद्र आणि राज्य सरकारने अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबवल्या आहेत. त्याचा भाजपच्या अनेक नेत्यांना लाभ झाला आहे. देवळालीसह पुण्यातील दोन छावणी परिषदांवर संरक्षण मंत्रालयाने थेट उपाध्यक्ष नियुक्त केले आहेत.

या संदर्भात संरक्षण मंत्रालयाने केंद्रीय सरकार छावणी अधिनियम 2006 अन्वये येत्या 10 फेब्रुवारीला मुदत संपुष्टात येणाऱ्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षांच्या नियुक्ती केल्या आहेत. या नियुक्त साधारणपणे एक वर्षासाठी आहेत. मात्र नव्या निवडणुका होऊन लोकनियुक्त सदस्य कार्यभार स्वीकारत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारची मुदतवाढ देण्याचा प्रघात आहे. Deolali Cantonment Politics

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका (Cantonment Board Election) अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांप्रमाणेच दीर्घकाळ रेंगाळलेल्या आहेत. अनेक ठिकाणी कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करून लगतच्या महापालिका अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे.

मात्र त्याबाबत एकमत होत नसल्याने हे काम रेंगाळले आहे. त्याचा लाभ केंद्रात सत्ता असलेल्या भाजपच्या (BJP) स्थानिक नेत्यांना झाला आहे. राजकीय संपर्कातून अनेक ठिकाणी पक्षाच्या स्थानिक नेत्यांना उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सात कॅन्टोन्मेंट बोर्ड आहेत. यातील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डचे उपाध्यक्षपद रिक्त ठेवण्यात आले आहे. देवळालीच्या कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष प्रीतम दिनकर आढाव यांची फेरनियुक्ती झाली आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्षपदी सचिन मथुरावाला तर देहू रोडला कैलास पानसरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर कॅन्टोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्षपदी वसंत राठोड, कामटी येथे (नागपूर) कमल किशोर यादव तर औरंगाबाद येथे प्रशांत तारगे यांची नियुक्ती झाली आहे.

या सर्वांना बोर्डाच्या निवडणुका न झाल्याने भाजप सरकारकडून न्यू इयर गिफ्ट मिळाले आहे त्यामुळे हे पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांनी जल्लोष व्यक्त केला आहे.

संरक्षण विभागाने काढलेल्या अध्यादेशामध्ये अनेक ठिकाणी लोकनियुक्त समितीची ही पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी नियुक्त झालेले पदाधिकारी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. या पदाधिकाऱ्यांना छावणी परिषदेच्या समितीत थेट कार्यकारी अधिकार प्राप्त होतात. विविध विकासकामे तसेच अन्य निर्णय त्यांच्याकडून घेतले जातात. यानिमित्ताने जनतेशी संपर्कासोबतच विविध राजकीय लाभ प्राप्त होत असल्याने या नेमणुकांना राजकीय दृष्ट्या मोठे महत्त्व आहे.

महाराष्ट्रातील 7 कॅन्टोन्मेंट बोर्ड

1. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

2. देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड

3. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड

4. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

5. कामटी (नागपूर) कॅन्टोन्मेंट बोर्ड

6. औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड

7. नगर कॅन्टोन्मेंट बोर्ड

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT