Case Filed Against MP Sanjay Raut
Case Filed Against MP Sanjay Raut  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik : पक्ष, धनुष्यबाण गेल्यानंतर ठाकरे गटावर पहिला गुन्हा दाखल ; एका शब्दामुळे मोठा नेता अडचणीत..

सरकारनामा ब्युरो

Case Filed Against MP Sanjay Raut : शिवसेना पक्ष, धनुष्य़बाण चिन्ह गेल्यानंतरही ठाकरे गटाच्या नेत्यांवरील संकटांची मालिका संपलेली दिसत नाही. (Sanjay Raut Latest News)

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत. कारण त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला हा पहिला गुन्हा आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात (Panchvati Police Station) राऊतांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत काही दिवसापूर्वी राऊतांनी वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी तक्रार दिली होती.

संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांच्याबद्दल चाटूगिरी असा शब्द वापरला. तसेच त्यांनी पत्रकारपरिषदेत मुख्यमंत्र्यांची बदनामी सुद्धा केली, असा आरोप शिंदे गटाचे शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी केला आहे.

अमित शाहांनी (Amit Shah) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाच्या लौकिकास बाधा आणून बदनामी केल्याचे बेलदार यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. राऊत यांच्याविरोधात कलम ५०० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

शिंदेच्या शिवसेनेतील बंडानंतर संपूर्ण राज्याच्या राजकारणात नवीन घटना घडत आहेत. राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष पाहायला मिळत आहे. या परिस्थितीत नशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष विकोला जात आहे. काल (रविवारी) दादरमध्ये शिवसेना भवनासमोर ठाकरे गटाने शक्तीप्रदर्शन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT