Ishwarlal Jain RL Jewellers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ishwarlal Jain RL Jewellers : शरद पवार राष्ट्रवादीच्या माजी खासदाराच्या RL ग्रुपची चौकशी; सीबीआयच्या चौकशीवर ईश्वरलाल जैन यांचा स्टेट बँकेवर पलटवार

CBI revisits RL Group, RL Jewellers and Manraja Motors SBI loan fraud investigation; former MP Ishwarlal Jain denies all allegations : माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्याशी संबंधित RL ज्वेलर्स आणि मानरजा मोटर्स या कंपन्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने पुन्हा चौकशीची कारवाई सुरू केली.

Pradeep Pendhare

Jalgaon News : जळगावातील उद्योगपती आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्याशी संबंधित राजमल लखीचंद (RL) ग्रुप, RL ज्वेलर्स आणि मानरजा मोटर्स या कंपन्यांवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) पुन्हा चौकशीची कारवाई सुरू केली आहे.

चार वर्षांपूर्वी नोंद झालेल्या बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणात काल शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने संबंधित कंपन्यांची चौकशी करत काही महत्त्वाची कागदपत्रे आणि लॉकरच्या चाव्या ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र, या संपूर्ण प्रकरणात कोणतेही तथ्य नसल्याचा ठाम दावा माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी केला आहे. स्टेट बँकेने (Bank) केलेले दावे चुकीचे आहेत. उलट बँकेकडे आमचेच पैसे बाकी आहेत. सीबीआय तपास करत असली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही, असे जैन यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांपासून जळगावातील (Jalgaon) ईश्वरलाल जैन यांच्या RL ग्रुपच्या आर्थिक व्यवहारांची विविध केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. RL ग्रुपने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) मोठे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड न झाल्याचा आरोप करत स्टेट बँकेने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सुमारे चार वर्षांपूर्वी RL ग्रुपच्या संचालकांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.

या प्रकरणातच शुक्रवारी सीबीआयने RL ज्वेलर्ससह संबंधित कंपन्यांमध्ये पुन्हा चौकशी केली. तपासादरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि लॉकरच्या चाव्या ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या कारवाईबाबत सीबीआयने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

ईश्वरलाल जैन यांचा पलटवार

सीबीआय चौकशी झाल्याची पुष्टी करताना ईश्वरलाल जैन यांनी स्टेट बँकेच्या दाव्यांवर गंभीर आक्षेप घेतला. बँकेने दिलेल्या कर्जापेक्षा अधिक रक्कम आमच्याकडून वसूल केली आहे. उलट आमचेच पैसे बँकेकडे अडकले आहेत. त्यामुळे आमच्यावर करण्यात आलेले आरोप निराधार आहेत, असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, सीबीआय तपासात पूर्ण सहकार्य केले जात असून, सत्य समोर आल्यानंतर सर्व आरोप फोल ठरतील.

2022 मध्येही पडला होता CBIचा छापा

यापूर्वी 13 डिसेंबर 2022 रोजी सीबीआयच्या सुमारे 20 ते 25 अधिकाऱ्यांच्या पथकाने RL ज्वेलर्सवर मोठी कारवाई केली होती. त्या वेळीही कोणत्या विशिष्ट प्रकरणात चौकशी सुरू आहे, याबाबत सीबीआयने कोणतीही माहिती दिली नव्हती. संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीयतेत पार पडली होती. सध्या या प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून, सीबीआयच्या ताज्या चौकशीमुळे RL ग्रुप आणि ईश्वरलाल जैन पुन्हा चर्चेत आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT