Jalgaon News: मराठा (Maratha) विद्याप्रसारक सहकारी संस्थेचा ताबा मिळविण्यासाठी भोईटे गटाकडून अॅड. विजय पाटील यांचे अपहरण करून डांबून ठेवले. या प्रकरणात मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह २९ संशयितांचा समावेश होता. मंत्री महाजन यांच्यासह नऊ संशयितांवर मोक्काअंतर्गत कलम वाढविण्यात आले होते. या गुन्ह्याच्या तपासाकरिता सीबीआय (CBI) पथके जळगावात ठाण मांडून आहे. (CBI team registered Sunil Zanwar`statement in Pen drive case)
निंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा नंतर पुण्याला वर्ग करण्यात येऊन यात मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २९ संशयितांचा समावेश होता. सोमवारी सुनील झंवर, पारस ललवाणी, नितीन लढ्ढा यांचे जबाब नोंदविण्यात येऊन दस्तऐवज ताब्यात घेण्यात आले.
गुन्ह्यात मंत्री गिरीश महाजन यांना मोक्काअंतर्गत कलम वाढविण्यात आल्यानंतर विधानसभेत पेनड्राइव्ह कांड गाजले. तत्कालीन विरोधी पक्षनेते विद्यमान गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ॲड. प्रवीण चव्हाण यांचे स्टिंग ऑपरेशन असलेले पेनड्राइव्ह विधानसभेत सादर करून खळबळ उडवून दिली. कालांतराने हा गुन्हा सीबीआयकडे तपासाला देण्यात आला होता. शुक्रवारी याच गुन्ह्याच्या तपासाकरिता सीबीआय अधिकाऱ्यांचे पथक जळगावात दाखल झाले आहे.
पथकाने शनिवारी मविप्र संस्थेत धडक देत कार्यालयाची पाहणी केली. हाणामारीच्या घटनांचा सखोल तपास केला. तसेच, तत्कालीन संचालक गोकूळ पिंताबर पाटील, परमानंद साठे, वीरेंद्र भोईटे, महेंद्र भोईटे, शिवाजी भोईटे, अलका पवार, सुषमा इंगळे, जयवंतराव येवले, जयवंतराव देशमुख आदींसह १३ जणांचे लेखी जबाब नोंदवून घेतले.
फिर्यादी विजय भास्कर पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे ज्या फ्लॅटमध्ये त्यांना डांबून ठेवण्यात आले होते तो फ्लॅट सुनील देवकीनंदन झंवर यांच्या मालकीचा असल्याने सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी झंवर पिता- पुत्राला अजिंठा विश्रामगृहावर चौकशीसाठी बोलावले होते. तेथे, चौकशी दरम्यान झंवर यांनी सांगितले, की या फ्लॅटवर माझी मुलगी शिक्षणासाठी राहात होती. नंतर तो रिकामाच होता. असे कधी घडलेच नाही. सोबतच या प्रकरणात मार्च महिन्यातच उच्च न्यायालयात रिटपिटीशन टाकून गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्व २९ लोकांचे मोबाईल नंबर व त्यांचे लोकेशन मिळण्यासाठी मागणी केली होती. त्यानुसार खंडपीठाने आदेश करूनही त्यावर काम झाले नाही.
आर्थिक गुन्हे शाखेच्या सुचेता खेाकले यांनी बीएचआर प्रकरणात सूरज झंवर यांना अटक केल्यावर या फ्लॅटवर केलेल्या पंचनाम्यात लॅपटॉप व काही दस्तऐवज जप्त केल्याचे नमूद केले. त्याबाबत विचारणा केली असता, असेकाही जप्तच केले नाही, असे त्यांनी लेखी स्वरूपात दिल्याचे कागदपत्रे, खंडपीठाचे आदेशाच्या प्रती सीबीआयने ताब्यात घेतल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.