Nashik Politics: नाशिकमध्ये काँग्रेसला धक्का; तांबे-थोरातांच्या समर्थनार्थ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Congress News : काँग्रेस पक्षाकडून थोरात-पटोले वादावर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे.
Dr. Sudhir Tambe, Satyajit Tambe, Balasaheb Thorat
Dr. Sudhir Tambe, Satyajit Tambe, Balasaheb ThoratSakarnama
Published on
Updated on

Nashik Congress Politics : नाशिक पदवीधर निवडणुकीत ऐनवेळी सुधीर तांबे यांनी माघार घेतली होती. याचवेळी सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.यानंतर काँग्रेसमधून तांबे पिता-पुत्रांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यामुळे काँग्रेसमधील तांबे-थोरात आणि पटोले यांच्यातील वादही विकोपाला गेला होता.

तसेच थोरातांनी थेट विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेससह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. पण अद्यापही या वादाचे तीव्र पडसाद उमटत असून तांबे कुटुंबाच्या समर्थनार्थ नाशिकमध्ये काही काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पदवीधरच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे यांना प्रदेश काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिली असून त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामा देत आहोत असंल्याचं जाहीर केलं आहे. हे सर्व पदाधिकारी नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील आहे.

यात तालुकाध्यक्ष विशाल जाधव, युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप भोये, एनएसयूआयचे अध्यक्ष ललित मानभाव, सहकार सेलचे अध्यक्ष कुमार भोंडवे, युवती काँग्रेसच्या अध्यक्ष रेखा भोये, महिला शहराध्यक्ष रुख्मिणी गाडर यांसह काही पदाधिकार्यांचा समावेश आहे.

Dr. Sudhir Tambe, Satyajit Tambe, Balasaheb Thorat
Thane NCP News : राष्ट्रवादीला ठाण्यात पुन्हा मोठा हादरा : पवारांच्या निकटवर्तीयाचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेस पक्षाकडून थोरात-पटोले वादावर तोडगा काढण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहे. मात्र, या वादाची धग अजूनही कार्यकर्त्यांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या सामूहिक राजीनाम्यामुळे स्पष्ट होत आहे. या सामूहिक राजीनामा पत्रात पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात, (Balasaheb Thorat) सुधीर तांबे यांना प्रदेश काँग्रेसने अपमानास्पद दिली असून, त्याचा निषेधार्थ आम्ही सर्व पदाधिकारी सामूहिक राजीनामा देत आहोत.

पेठ तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे हे राजीनामा पत्र जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्याकडे पाठविण्यात आले असून त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही सादर करण्यात आली आहे. या पत्राद्वारे डिजिटल सभासद नोंदणी व बूथ विसर्जित करत असल्याचेही पदाधिकार्यांनी सांगितलं आहे.

Dr. Sudhir Tambe, Satyajit Tambe, Balasaheb Thorat
Udayanraje Bhosale : उदयनराजेंनी राज्यकर्त्यांना सुनावलं ; म्हणाले, "कोश्यारींचा राजीनामा घेण्यात .. "

सत्यजीत तांबेंचा महाविकास आघाडीला धक्का...

काँग्रेसमधून बंड करत सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीच्या निकालावर लागले होते. महाविकास आघाडीनं पाठिंबा दिल्यानंतर उमेदवार शुभांगी पाटील यांच्याकडून वारंवार विजयाचा दावा सांगण्यात येत होता. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे.

सत्यजीत तांबे(Satyajeet Tambe)यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली आहे. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. पाटील यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी दारूण पराभव करत तांबे यांनी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com