Chhagan Bhujbal News |OBC aarakshan news | OBC reservation news Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

केंद्र सरकारने ठरवले तर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेल!

छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारने निर्णय घेण्याचा आग्रह धरला.

Sampat Devgire

नाशिक : केंद्र सरकारने (Centre Government) राष्ट्रीय स्तरावर ओबीसी आरक्षणाबद्दल (OBC Reservation) निर्णय घेतल्यास त्याचा व्यापक समाजाला लाभ होईल. देशातील सर्व राज्यांमधील ओबीसींवर असलेले संकट दूर होईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.

श्री. भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ट्रिपल टेस्टशिवाय ओबीसींना आरक्षण देता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय संपूर्ण देशाला लागू आहे. केंद्र सरकारने जर देश पातळीवर ओबीसी आरक्षणाबद्दल निर्णय घेतला तर सगळ्या राज्यांतील ओबीसींवर असलेले हे संकट दूर होईल. (OBC reservation news Updates)

ओबीसी आरक्षणासंदर्भात मध्य प्रदेश सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा दाखलाही त्यांनी दिला. ते म्हणाले की, मध्य प्रदेश सरकारने एक अध्यादेश काढून काही अधिकार स्वत:कडे घेतले. ज्यात प्रभाग रचना व आरक्षण आदींचा समावेश होता. निवडणूक आयोगाकडे त्यांनी फक्त निवडणुका घेण्याचा अधिकार राखीव ठेवला. आम्हीही त्याच मार्गाने जाण्याचा विचार करत आहोत. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी याबाबत होकार दर्शवला आहे.

श्री. भुजबळ म्हणाले, यासंदर्भातील प्रस्ताव सादर झालेले आहेत. त्यात काही अडचणी असतील तर त्यासाठी एक बैठक बोलावण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि इतर सगळ्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. सदर बैठकीत या विषयावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करून लवकरात लवकर ओबीसी आरक्षण मंजूर होण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन संबंधितांनी दिले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT