Dr Subhash Bhamre News, Dhule News in Marathi
Dr Subhash Bhamre News, Dhule News in Marathi Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी आमचे प्रयत्न

Sampat Devgire

म्हसदी : शेतकरी (Farmers) हा केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून कृषी विज्ञान केंद्र, विद्यापीठाचे नवीन व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील असून जिल्ह्यातील (Dhule) शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदत होत असल्याचे मत खासदार डॉ. सुभाष भामरे (Dr Subhash Bhamre) यांनी केले. (BJP leader claim centre government will double the farmers income)

श्री. भामरे म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या कच्च्या मालापासून टिकाऊ उत्पादने तयार करण्यासाठी प्रक्रियायुक्त पदार्थ करण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी विविध योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठ वर्षाच्या कालावधीत कार्यान्वित झाल्या आहेत. (Dr Subhash Bhamre News)

धुळे येथील कृषी विज्ञान केंद्र आणि कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत गरीब कल्याण संमेलन शत प्रतिशत सशक्तीकरण निमित्ताने वेब संवाद आणि शेतकरी मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते.

खासदार डॉ. भामरे म्हणाले, शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधी तसेच पंतप्रधान आवास योजनांद्वारे शेतकऱ्याच्या प्रगतीसाठी व उत्थानासाठी कार्य करत आहे. शेतकऱ्यांना वसंतराव नाईक शेती निष्ठ पुरस्कार व कृषी भूषण पुरस्कार यासारखे पुरस्कार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. मेळाव्याच्या तांत्रिक सत्रामध्ये डॉ.मुरलीधर महाजन यांनी एकात्मिक कापूस लागवड तंत्रज्ञान आणि प्रा.श्रीधर देसले यांनी भाजीपाला लागवड तंत्रज्ञान याविषयावर मार्गदर्शन केले. डॉ. पंकज पाटील यांनी प्रास्ताविक केले.

कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. चिंतामणी देवकर, कृषी विद्या वेत्ता डॉ. मुरलीधर महाजन, डॉ. राहुल देसले, प्रा. श्रीधर देसले, डॉ. पंकज पाटील उपस्थित होते.

कृषी उद्योगात युवक, महिलांनी घ्यावा सहभाग

डॉ. चिंतामणी देवकर यांनी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती सोबतच विषमुक्त शेतीच्या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकाएवजी जैविक कीटकनाशके, जैविक खते वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊन पर्यावरण पूरक शेती होण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांनी उत्पन्न दुप्पट करण्याकरिता कृषी व कृषी पूरक प्रक्रिया उद्योगाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. युवकांनी, शेतकरी, महिला आदी यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केले.

कृषी भूषण पुरस्कार प्राप्त सामोडे येथील शेतकरी डॉ. नरेंद्र भदाणे यांचा खासदार डॉ.भामरे यांच्या हस्ते सत्कार झाला. तसेच कृषी विज्ञान केंद्र, मधुमक्षिका पालन, पशुपालन व दुग्ध व्यवसाय आणि दुग्ध प्रक्रिया उद्योग, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उन्नयन योजना असे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT