BJP MP Raksha Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Jalgaon Politics: रक्षा खडसेंनी दिला केळी उत्पादकांना दिलासा!

Centre instructionfor Complain resolvation committee for Horticulture as well banana crop-केळी उत्पादकांना पीकविमा मिळण्यासाठी खासदार खडसे यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यावर प्रशासन हलले.

Sampat Devgire

Banana Farmers issue : जळगाव जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक केळी उत्पादकांना विमा कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात नकारात्मक अहवाल दिला होता. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चा काढला होता. त्यामुळे भाजपविरोधात शेतकऱ्यांचा रोष होता. (Jalgaon collector orders committee formation after Centre agreeculture minstry instruction)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजप (BJP) यांच्यात परस्परांवर टीका सुरू होती. या राजकारणामुळे खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांनी थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांची भेट घेऊन हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती.

पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना आंबिया बहार- २०२२ मध्ये विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना आजपर्यंत नुकसानीबाबत पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. या शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून राज्याच्या कृषी सचिवांना आदेश देण्यात आले आहेत.

खासदार खडसे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व शोभा करंदलाजे यांची कृषी मंत्रालय, दिल्ली येथे भेट घेतली होती. तसेच केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.

फळ पीकविमा योजना आंबिया बहार २०२२’मध्ये विमा उतरविलेला जिल्ह्यातील अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान होऊनसुद्धा आजपर्यंत पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. त्यात अनेक समस्या आहे. त्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करण्याबाबत खासदार खडसे यांनी केली होती. आज त्याबाबत कार्यवाही होऊन केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून तक्रार निवारण समिती गठीत करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. खासदार खडसे यांच्या प्रयत्नांमुळे केळी उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT