Ravikant Tupkar News : 'आता गनिमी काव्याने सरकारच्या बुडाखाली आग लावू...'

Soybean-Cotton Rate Issue : शेवटी सरकार झुकलं. सरकारला आम्हाला चर्चेला बोलवावं लागलं.
Ravikant Tupkar
Ravikant Tupkar Sarkarnama
Published on
Updated on

Buldana : सोयाबीन, कापूस उत्पादकांचा प्रश्न सरकारने १५ डिसेंबरपर्यंत सोडवला नाही, तर त्यानंतर आंदोलन हे सरकारच्या पायाखालची वाळू सरकावणारं असेल. आता आम्ही काय करणार आहे, हे सांगणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमा कावा वापरू. पण, सरकारच्या बुडाखाली आग लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शेतकरी रविकांत तुपकर यांनी सरकारला पुन्हा दिला. (Ravikant Tupkar's warning to the government on the issue of soybean, cotton producers)

सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील सोमटाणा आंदोलन केले होते. त्यानंतर तुपकर मुंबईत गेले होते. त्या ठिकाणी त्यांना सरकारने चर्चेसाठी बोलावले. मुंबईत आल्यानंतर तुपकर यांनी आज सोमटाणा येथे येऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी सरकारला इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ravikant Tupkar
Maharashtra Winter Session : कैलास गोरंट्याल विधानसभेत उद्या बॉम्ब फोडणार; मित्र म्हणत कोणाला दिला इशारा...

चिखली तालुक्यातील सोमटाणा गावाने सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नावर उभारलेल्या आंदोलनाला प्रचंड पाठबळ दिलं. या गावच्या पाठबळाच्या जोरावरच हे आंदोलन इतक्या ताकदीनं मोठं झालं. सरकारला आमच्या मागणीपुढे झुकावं लागलं आणि त्यांनी आम्हाला चर्चेला बोलावलं, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, सोमटाणा गाव हे सोयाबीन, कापूस आंदोलनाचे केंद्रबिंदू झालं आहे. भविष्यातही ते शेतकरी आंदोलनाचे केंद्रबिंदू असेल, असा निर्णय आज आम्ही गावकऱ्यांशी चर्चा करून घेतला आहे. सोयाबीन, कापूस आंदोलनाच्या संदर्भात जी काही दिशा ठरेल ती याच गावातून ठरेल आणि जो काही निर्णय होईल, तो सोमटाणा गावातच होईल.

Ravikant Tupkar
Winter Session 2023 : ‘ओ..ऽ लंडन रिटर्न दानवे,’ म्हणत संजय शिरसाटांनी काढला चिमटा

या गावाने माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर प्रचंड प्रेम केलेले आहे. येथील गावकऱ्यांनी आंदोलनासाठी निधी गोळा केला. एक रुपयासुद्धा येथील गावकऱ्यांनी आम्हा खर्च करू दिला नाही, त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मी सोमटाणा गावात आलो होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ravikant Tupkar
Nagpur Winter Session 2023 : विधानसभेत ‘या’ नऊ माजी सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडून कामकाज स्थगित

आम्ही आज अर्धी लढाई जिंकली आहे. जे सरकार आम्हाला चर्चेला बोलावत नव्हतं. आम्ही मुंबईला गेलो, तेथील आंदोलनातसुद्धा सोमटाणा गावाचाच सिंहाचा वाटा होता. शेवटी सरकार झुकलं. सरकारला आम्हाला चर्चेला बोलवावं लागलं. आमच्या ७० टक्के मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याच्या अंमलबजावणीसाठी सरकारने पंधरा दिवस ते महिनाभराचा अवधी मागितला आहे. आम्ही पंधरा डिसेंबरपर्यंत वाट बघू. पंधरा डिसेंबरनंतरचे आंदोलन हे सरकारच्या पायाखालची वाळू सरकावणारं असेल, असेही तुपकर यांनी नमूद केले.

Ravikant Tupkar
Assembly Winter Session : वडेट्टीवारांच्या शेतकऱ्यांवरील प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com