Kunal Patil, Congress Leader
Kunal Patil, Congress Leader Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

केंद्र महाराष्ट्राचा अवमान करते, म्हणूनच भाजप नेते महाराष्ट्रद्रोही आहेत!

Sampat Devgire

नाशिक : महाराष्ट्र सरकार विविध स्तरावर प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत आहे. अशा स्थितीत केंद्र सरकार सातत्याने महाराष्ट्राच्या हक्काच्या जीएसटी परताव्यासाठी देखील अडवणूक करते. त्यामुळे भाजपचे राज्यातील नेते महाराष्ट्रद्रोही आहेत. त्यांना फक्त महाराष्ट्र सरकारवर खोटी टिका करून दिल्लीच्या नेत्यांना प्रसन्न ठेवायचे आहे. जनता संकटात गेली तरी चालेल, अशी टिका काँग्रेस नेते, आमदार कुणाल पाटील (Congress leader Kunal Patil) यांनी केली आहे.

यासंदर्भात आमदार पाटील यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणतात, महाराष्ट्राकडून खोऱ्याने कर जमा करणारे मोदी सरकार कर परतावा देताना मात्र महाराष्ट्राला नेहमीच सावत्र वागणूक देत आलं आहे. महाराष्ट्राच्या हक्काचा तीस हजार तोटींपेक्षा जास्त कर निधी मोदी सरकरकडे पडून असताना उपकार केल्यासारखे केवळ तीन हजार ३५ कोटी रुपये देणे हा माहाराष्ट्राचा अवमान आहे.

एकट्या ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र राज्यातून केंद्राकडे जाणारा जीएसटी तब्बल एकोणीस हजार ९०० कोटी रुपये आहे. प्रत्यक्षात केंद्राकडून परतावा किती येतो? तर फक्त तीन हजार ५३ कोटी रुपये. म्हणूनच आम्ही राज्यातील भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्रद्रोही म्हणतो.

गेले वर्षभर कोरोनाचे संकट तसेच राज्य शासनाचा कमी झालेला महसूल अशी स्थिती आहे. शासनाने कोरोनाशी लढा देताना कोरोवा लसीकरण, वैद्यकीय सुविधांच्या सुधारणा, ऑक्सीजन प्रकल्प तसेच विकासकामे अशा विविध स्तरावर चांगले काम केले आहे. प्रतिकुल स्थितीत लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर राहिले. त्यामुळे खरे तर महाविकास आघाडीचे अभिनंदन केले पाहिजे. मात्र भाजपचे नेते राज्याचे नुकसान झाले तरी चालेल, राज्य शासनाची अडवणीक होत असेल तरी चालेल मात्र भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांना खुष ठेवण्यात मश्गुल दिसतात, अशी टिका त्यांनी केली.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT