Pravin Darekar, BJPleader
Pravin Darekar, BJPleader Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

चंद्रकांत दादांवर केंद्रीय नेतृत्व नाराज हे मी पहिल्यांदाच ऐकतोय!

Sampat Devgire

नाशिक : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याबाबत केंद्रीय नेतृत्वाच्या नाराजीविषयी कोणत्याही प्रकारे नाराजीची चर्चा नाही. हे मी पहिल्यांदाच ऐकतोय, असे भारतीय जनता पक्षाचे नेते, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी सांगितले.

श्री. दरेकर आज नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार व त्यांतील विविध मंत्र्यांबाबत नेहेमीच्या आरोपांचा पुनरूच्चार केला. लवकरच महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल. त्याचा मुहूर्त सांगणार नाही, मात्र आता आम्ही गनिमी काव्याने काम करू, असे ते म्हणाले.

श्री दरेकर म्हणाले, पाच वर्षांचा देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात विकासाची कामे आपण पाहिली. भ्रष्टाचाराचा एकही डाग लावून न घेतलेले ते सरकार होते. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र वीस वर्षे मागे गेला आहे. सुरु असणारे प्रकल्प ठप्प झाले आहेत. अर्ध्या मंत्रीमंडळावर डाग आहेत. गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर गेला. ही महाविकास आघाडी सरकारची उपलब्धी असुन कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी म्हणाले, जनतेने आम्हाला आपलं मानलं आहे. मात्र सरकारने जनतेला आपलं मानलं नाही अशी टिका दरेकर यांनी केली. गेल्या दोन वर्षात राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही. यातून केवळ आमचं सरकारच मार्ग काढू शकतं. निश्चित पणे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात सरकार येणार. कधी येणार हे आम्ही सांगणारनाही. यावेळी थोडं शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने वागणार आहोत, याचा पुनरूच्चार करीत, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड वादग्रस्त विधाने करून वातावरण बिघडवतात. ते आता मंत्री आहेत. त्यांनी नी जवाबदरीने वागावं अशी अपेक्षाही श्री. दरेकर यांनी व्यक्त केली.

राजकारणाचे गुन्हेगारीकरण

ते म्हणाले, नाशिक शहर गुन्हेगारी नगरी होते आहे का? अशी भीती नाशिककरांना वाटू लागली आहे. भाजपाच्या मंडल अध्यक्षाची राजकीय आर्शीवादाने खुलेआम निर्घृण हत्या करण्यात आली. कामगार संघटनेच्या वर्चस्वावरून वाद झाल्याच स्पष्ट आहे. संशयीत आरोपी विनोद बर्वे याने युनियनच्या बॅनरवर पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांचे फोटो लावले होते. काही दिवसांपूर्वी संशयीत बर्वे याने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

श्री. भुजबळ यांनी त्याला चांगली जवाबदारी देणार अस म्हटले होते. हीच जवाबदारी दसणार होती का? असे सांगूनन भुजबळ पालकमंत्री झाल्यावर शहरातील गुन्हेगारी वाढली. या प्रकरणात मोक्का किंवा फाशी अशी शिक्षा अपेक्षित आहे. हा आरोपी बाहेर आला तर कायद्यावर विश्वास राहणार नाही, अशी अमोल ईघे यांच्या बायकोची अपेक्षाहोती. हा खटला फास्ट ट्रॅक मध्ये चालवावा. याविषयी विधानसभेत हा मुद्दा आम्ही उपस्थित करणार आहोत.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT