Dr. Bharti Pawar
Dr. Bharti Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dr. Bharti Pawar News; आर्थिक विकासाचा दर सात टक्क्यांपर्यंत जाईल

Sampat Devgire

नाशिक : (Nashik) केंद्र सरकारने (Centre Government) सादर केलेला अर्थसंकल्प (Union Budget) सर्वसमावेशक असून, बजेटच्या माध्यमातून आर्थिक विकासाचा दर सात टक्क्यांपर्यंत जाईल, असा दावा (BJP) केंद्रीय आरोग्य (Health) राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांनी केला. (Current Union budget is comprihensive for society)

केंद्र सरकारने नुकताच अर्थसंकल्प सादर केला. त्या पार्श्वभूमीवर डॉ. पवार यांनी येथील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.

त्या म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशाला नव्या आर्थिक वळणावर नेणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था सुस्थिती ठेवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झाला आहे. लोकांचा सहभागही अर्थसंकल्पात नोंदवला आहे. डिजिटल क्रांती व पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था पोचवण्याचे काम यातून दिसून येते.

दोन कोटी ७९ लाख लोकांना आवास योजनेचा लाभ, नऊ कोटी महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ, सहा कोटींपेक्षा अधिक घरांना नळजोडणी आदी योजना अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. किसान सन्मान योजनेतून अकरा कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली आहे. आयुष्यमान भारत योजनेतून पन्नास कोटी लाभार्थ्यांना सामावून घेण्याचे काम झाले. हरित विकास व लघुउद्योगांना कर्ज सुविधा उपलब्ध करून दिल्या. मिलेटच्या माध्यमातून कडधान्याचे मार्केटिंग तसेच मत्स्य संवर्धनासाठी सहा हजार कोटींची गुंतवणूक हे अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे.

सहकारी सोसायट्यांना जास्तीत जास्त सशक्त करण्याचे काम झाले. १५७ वैद्यकीय महाविद्यालये व नर्सिंग कॉलेज उघडण्याचे ध्येय ठेवून आरोग्य व्यवस्था भक्कम करण्याचे सरकारचे धोरण आहे. कधी नव्हे, ते ‘सिकलसेल’ या आजारासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेचे बजेटदेखील यंदा वाढले आहे. एअर कनेक्टिव्हिटी तसेच हरित विकास, युवाशक्ती, वित्तीय क्षेत्र भक्कम करणे, शिक्षण क्षेत्रातील बजेटमध्ये वाढ संरक्षणासाठी पाच लाख कोटींची गुंतवणूक, पर्यटनाला चालना ही वैशिष्ट्ये अर्थसंकल्पाची असल्याचे पवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT