Dr. Bharati Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shocking News : केंद्रीय मंत्री भारती पवार म्हणतात, ‘मी महामार्गाने प्रवास बंद केला’

Sampat Devgire

Dr. Bharati Pawar News : देशात महामार्ग निर्मितीत अनेक चांगली कामे होत आहेत. मात्र, नाशिकच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे काम अतिशय निराशाजनक आहे. त्यामुळे मी महामार्गाने जाणे-येणेच बंद केले आहे, अशी नाराजी व्यक्त करीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे धिंडवडे काढले. (Nashik`s NHAI department`s works are qualityless & worst)

नाशिक (Nashik) -मुंबई (Mumbai) महामार्गाची दुरवस्था झाली असून, त्याबाबत सातत्याने तक्रारी करूनदेखील प्रशासन ढिम्म आहे. याबाबत खुद्द केंद्रीय (PWD) राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांनी संताप व्यक्त केला.

मुंबई आग्रा महामार्गाची देखभाल दुरुस्ती आणि व्यवस्थेचे नियंत्रण राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे आहे. नितीन गडकरी हे या विभागाचे केंद्रातील कार्यक्षम मंत्री म्हणून ओळखले जातात. देशातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या विभागाने यशस्विपणे राबविल्याची चर्चा नेहेमीच घडवली जाते. त्यामुळे गडकरी यांना रोडकरी असेदेखील संबोधले जाते.

देशातील स्थिती खरोखर तशी आहे, की तशी पब्लिसिटी होते, याविषयी शंका यावी अशी स्थिती अनेकदा निर्माण होते. त्याचे कारण म्हणजे, नाशिक-मुंबई महामार्गाबाबत अनेक तक्रारी असतात. या तक्रारी नागरिकांच्या असल्यावर हे प्रशासन त्याची दखलदेखील घेत नाही. मात्र, अगदी राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रीदेखील या तक्रारी करते. आता त्यात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भर पडली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या एका बैठकीनंतर खुद्द डॉ. पवार यांनीच बैठकीत जाहीरपणे तशी कबुली दिली. मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे, जागोजागी नादुरुस्त रस्ता याबाबत त्या म्हणाल्या, या महामार्गावर कायमच खूप खड्डे असतात. त्याचा फार त्रास होतो. त्यामुळे मी स्वत: आता या रस्त्याने प्रवासच बंद केला आहे. त्याऐवजी मी छत्रपती संभीजनगर मार्गे प्रवास करते.

खुद्द मंत्र्यांनीच ही स्थिती मांडल्याने उपस्थित अधिकारी, लोकप्रतिनिधीदेखील निरुत्तर झाले. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांपुढे त्यांनी अनेक तक्रारी मांडल्या. मुंबई-नाशिक महामार्गावरील जीवघेण्या प्रवासाला सामान्य नागरिक कंटाळले आहेत. त्याबाबत मंत्रीदेखील हतबल असल्याचे दिसल्याने राज्य सरकारच्या कारभाराविषयी हा घरचा आहेर ठरला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT