Nashik Politcc News : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना कायम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या ट्रिपल इंजिनच्या सरकारमधील शिंदे गटात उल्हास निर्माण झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ गटामध्ये निराशा पसरील आहे. (Shivsena Eknath Shinde Group have only two MLAs in Nashik District)
नाशिकचे (Nashik) मुख्यमंत्री शिंदे गटाचे (Eknath Shinde) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) गटात अवघे दोन आमदार आहेत. त्यात एक ते स्वतः तर दुसरे सुहास कांदे (Suhas Kande) यांच्याशी त्यांचे राजकीय सख्य सर्वश्रृत आहे. त्यामुळे पालकमंत्रीपदाचा उपयोग ते कसा करून घेतात याची उत्सुकता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना पालकमंत्री पद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांत नाराजी आहे. भाजप नेते गिरीश महाजन यांना नाशिकपासून दूर ठेवण्यात आल्याने भाजपमधील महाजन गटाच्या नेत्यांवर अक्षरशः तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी स्थिती झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सर्वाधिक सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने पालकमंत्रिपद या पक्षालाच मिळेल अशी अपेक्षा होती. त्यासाठी त्यांच्या नेत्यांकडून गेले काही दिवस मोठा राजकीय दबाव देखील निर्माण केला गेला होता. किंबहून पालकमंत्री आपलेच, या अपेक्षेने श्री. भुजबळ यांच्याकडे अधिकाऱ्यांची वर्दळ देखील होती.
राज्यातील महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग झाल्याने ‘ट्रिपल इंजिन’चे सरकार म्हणून संबोधले जाते. मात्र या ‘ट्रिपल इंजिन’च्या सरकारमध्ये अनेक महिन्यांपासून पालकमंत्रिपदाचा वाद सुरू होता. आता नियुक्त्या झाल्या, मात्र तो संपलेला नाही, अशीच स्थिती आहे.
नाशिकचे पालकमंत्रिपद भुसे यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे यापूर्वी बंदरे व खनिकर्म खाते होते. हे दुय्यम दर्जाचे खाते मानले जाते. त्यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना भुसे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याची जबाबदारी देण्यात आली. मोठ्या पदाची जबाबदारी आल्याने भुसे यांच्याकडील पालकमंत्री पदाची जबाबदारी काढली जाईल, अशी चर्चा होती. त्या अनुषंगाने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांनी बैठकांचा धडाका लावला होता. मात्र तसे घडले नाही, त्यामुळे शिंदे गटात उल्हास तर राष्ट्रवादीमध्ये फाल्गूनमास अशी स्थिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.