Manoj Jarange Vs Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhujbal Vs Jarange : आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या जरांगेंना भुजबळ देणार 'टफ'; नगरमधल्या सभेची तारीख ठरली

Obc News : मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे हे मुक्कामासाठी नगरमध्ये थांबणार...

Pradeep Pendhare

Nagar News : आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज व ओबीसी समाजाने रान पेटवले आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असून शनिवारपासून मनोज जरांगे हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे पायी निघाले आहेत. मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे हे मुक्कामासाठी नगरमध्ये थांबणार आहेत, यावेळी तिथे जरांगे यांची सभा होणार आहे. नगरमधील मुक्काम सभा यशस्वी व्हावा, यासाठी सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी सुरू आहे. दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांची नगरमध्ये होऊ घातलेल्या सभेची तारीख निश्चित झाली आहे. तीन फेब्रुवारीला नगरमध्ये त्यांची सभा होणार असून, त्यासाठी ओबीसी समाज समन्वयांकडून मैदानाची चाचपणी केली जात आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे ठाम आहेत, तशी भूमिकाच त्यांनी घेतली आहे. यावर ओबीसी समाजातील नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. विशेष करून मंत्री छगन भुजबळ यावर आक्रमक झाले आहेत. छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातील वाद टोकापर्यंत गेले आहेत. दोघे जण एकमेकांविरोधात बोलण्याची संधीच सोडत नाहीत. मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लावूनच दाखवा, असे सरकारला आवाहन दिले आहे.

मनोज जरांगे यांच्या जशा सभा राज्यभर होत होत्या. तशा मंत्री भुजबळ यांच्यादेखील होत आहेत. आता जरांगे यांची नगरमध्ये मुक्कामी सभा होत आहे. त्यांच्यापाठोपाठ मंत्री भुजबळ यांचीदेखील तीन फेब्रुवारीला सभा होत आहे. यासाठी नगर जिल्ह्यातील ओबीसी समाजाने पुढाकार घेतला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांची जंगी सभा व्हावी, यासाठी नगरमधून ४० जणांच्या शिष्टमंडळाने नाशिक येथे मंत्री भुजबळ यांची भेट घेतली. यानंतर मंत्री भुजबळ यांच्याकडून तीन फेब्रुवारीची तारीख मिळाली.

मंत्री भुजबळ यांची तारीख मिळताच, ओबीसी आणि भटक्या-विमुक्त समाजातील नेत्यांनी समन्वय समिती गठीत केली आहे. या समन्वय समितीच्या बैठकादेखील सुरू झाल्या आहेत. मैदान मिळवण्यासाठी चाचपणी सुरू आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी, तसेच राज्य आणि केंद्रापर्यंत ओबीसींचा योग्य इशारा जाण्यासाठी संपूर्ण ताकद ओबीसी समाजाकडून लावली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुक्कामी सभेवर मौन...

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha reservation) मनोज जरांगे पदयात्रेने निघाले आहेत. या यात्रेचा मुक्काम नगरमध्ये होणार आहे. या मुक्कामात सभा होणार आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी सकल मराठा समाजाकडून जय्यत तयारी केली जात आहे. या मुक्कामी सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ओबीसी नेत्यांनी मनोज जरांगे यांच्या मुक्कामवर मौन बाळगून बघ्याचीच भूमिका घेणे पसंत केले आहे. मंत्री छगन भुजबळदेखील (Chagan Bhujbal) या मुक्कामी सभेचा नगरमध्ये आल्यावर कशापद्धतीने समाचार घेतील, हेदेखील पाहण्यासारखे राहणार आहे.

(Edited by : Sachin Wgahmare)

R...

SCROLL FOR NEXT