Chairperson Kiran Kulewar
Chairperson Kiran Kulewar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News: अरेरे... बायको म्हणते, नगरसेवक असून काय उपयोग?

Sampat Devgire

Dhule News : धुळे शहरात नागरी समस्या पाचविला पुजल्या आहेत. मात्र त्यावरूनतर आता नवरा बायकोची भांडणेही होऊ लागलीत. ती देखील चक्क नगरसेवकांच्या घरात. पाणी (Water) उशीरा येत असल्याने बायको म्हणते, नगरसेवक असून काय उपयोग... हे गाऱ्हाणे आहे सत्ताधारी भाजपच्या (BJP) एका नगरसेवकाचे. यावरून सदस्य जरी गंभीर असला तरी उपस्थितांत मात्र हशा पिकला. (Ruling BJP corporators complains On Civic issues of Dhule)

गंमत म्हणजे आयुक्तांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत खुद्द सभापतीनीही तक्रारी केल्या. ते म्हणाले, मोकाटकुत्र्यांच्या प्रश्‍नावर तुमची उत्तरे ऐकून कुत्र्यांची तिसरी पिढी संपत आली. त्यामुळे समस्या कधी सुटणार याची तारीख सांगा.

महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा सकाळी अकराला महापालिकेच्या सभागृहात झाली. सभापती किरण कुलेवार, आयुक्त देवीदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, नगरसचिव मनोज वाघ, सदस्य, अधिकारी उपस्थित होते. एमआयएमच्या सदस्या नाजियाबानो पठाण यांनी मोकाट कुत्र्यांची समस्या मांडली.

त्यावर अतिरिक्त आयुक्त कापडणीस उत्तर देत असताना आपली अशी उत्तरे ऐकून कुत्र्यांची तिसरी पिढी संपत आली काम कधी सुरू होईल त्याची तारीख सांगा, असे सभापती श्रीमती कुलेवार म्हणाल्या. दरम्यान, कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचे काम प्राणिमित्र संस्थेच्या आक्षेपामुळे थांबल्याचे श्री. कापडणीस म्हणाले.

बायको म्हणते, काय उपयोग?

ज्या भागात पूर्वी ठरलेल्या दिवशी व वेळेवर पाणीपुरवठा व्हायचा त्या भागात आज आठ-आठ दिवस पाणी येत नाही. यामुळे अक्षरशः माझ्या घरातही भांडणे होतात. बायको म्हणते, नगरसेवक असून काय उपयोग, असे गाऱ्हाणे सत्ताधारी भाजप सदस्य नरेश चौधरी यांनी मांडले. कुमारनगर पुलावर अर्धा-अर्धा फूट खड्डे पडले तरी काम होत नाही. आता नागरिक आम्हाला डोळे वटारून पाहतात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT