Nashik News; भुसेंनी उलगडले गुपित...`या`मुळे मिळाले एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण!

शिंदे गटाचे मंत्री म्हणतात, शिवसेनेला निवडणूक आयोगापुढे काय म्हणायचे ते जमले नाही.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : (Nashik) राजकारणातील यशाला अनेक कारणे तयार होतात. निमित्त मिळते. असेच काहीसे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले, उद्धव ठाकरे (Uddhav Thackerey) गटाला आपली भूमिका मांडता आलेली नाही. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यात सरस ठरले. त्यामुळेच शिवसेना (Shivsena) पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दोन्ही त्यांना गमवावे लागले. (Eknath Shinde Group present there case properly at ECI, so they win)

Dada Bhuse
Nashik News; भाजप दत्तक नाशिकला विसरले की काय?

केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कायदेशीर मांडणी केल्यामुळेच धनुष्यबाण चिन्ह मिळाले. सर्वोच्च न्यायालयातही आम्ही अतिशय प्रभावीपणे मांडणी करीत आहोत. त्यामुळे आम्हालाच न्याय मिळेल, असा विश्वास पालकमंत्री भुसे यांनी येथे व्यक्त केला.

Dada Bhuse
Sanjay Raut News; ‘ती’ शरद पवारांची राजकीय खेळी?

श्री. भुसे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वीज पुरवठ्याबाबत महावितरण कंपनीच्या कामकाजाचा आढावा घेतला.

या बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. भुसे म्हणाले, की खासदार संजय राऊत यांचे धमकी प्रकरण हे प्रसिद्धीचा केविलवाणा प्रयत्न आहे. मुंबईची एजंटगिरी करण्यासाठी ते नाशिकला येत असतील, अशा शब्दांत भुसे यांनी राऊतांवर टीका केली.

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेच्या सुनावणीबाबत त्यांना विचारले असता लोकशाही प्रक्रियेत सर्वांनाच न्याय मागण्याचा अधिकार आहे. आपला देश घटना, नियम आणि कायद्यावर चालतो.

न्यायालयात कायद्यानुसार न्यायनिवाडा होऊन आम्हाला न्याय मिळेल, असे भुसे म्हणाले. लोकशाही प्रक्रियेत संख्येला अधिक महत्त्व आहे. त्यासाठीची खासदार, आमदार व पदाधिकाऱ्यांची संख्या आमच्याकडे जास्त आहे. त्या आधारावर केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय केल्याचा दावा भुसे यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com