Rajendra More & Shantaram Borse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chalisgaon Sarpanch : अबब... सरपंचाने आधी मागितला प्लॉट, मग दहा लाखाची लाच!

Chalisgaon Sarpanch Land Scam : दहा लाखाची लाच मागणारा चाळीसगावचा सरपंच राजेंद्र मोरे एसीबीच्या जाळ्यात अडकला

Sampat Devgire

Chalisgaon News: लाच मागण्याच्या घटना नव्या नाहीत. मात्र चाळीसगाव येथील एका सरपंचाने या सर्वांवर कडी केली आहे. त्याने केलेल्या प्रकाराने सबंध प्रशासकीय यंत्रणाच हादरली.

सरपंच म्हणजे गावातील नागरिकांना आधार असतो. मात्र मिळालेल्या अधिकाऱ्याचा दुरुपयोग केल्यावर एखादा सरपंच काय करू शकतो आणि नागरिकांना किती जेरीस आणू शकतो, याचा नमुणा चाळीसगाव (जळगाव) तालुक्यात पहायला मिळाला.

याबाबत पोलिस कारवाई सुरू आहे. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी देखील सरपंचाच्या या कृत्यात सहभागी झाले होते. त्यांनी एका वृद्धाच्या जमिनीवर चक्क ग्रामपंचायतचे आरक्षण दाखवून त्यावर प्रकल्प सुरू करण्याची कार्यवाही सुरू केली होती. त्यामुळे घाबरलेल्या या जमीनमालकाला वेठीस धरण्यात आले.

या प्रकरणातून कोर्ट कचेरीच्या जाचातून सुटका करण्यासाठी सरपंचाने चक्क दहा लाख रुपयांची लाच मागितली. जमीन मालक असलेल्या सत्तर वर्षीय वृद्ध तक्रारदाऱ्याला जेरीस आणले. या वृद्धाने ग्रामपंचायतीचे खेटे घातले. मात्र काहीच उपयोग झाला नाही.

बहाळ (चाळीसगाव) ग्रामपंचायतीत हा प्रकरा घडला. येथील सरपंच राजेंद्र मोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्याच्यासोबत ग्रामपंचायत कारकून शांताराम बोरसे आणि मध्यस्थ सुरेश ठेंगे यांनाही अटक झाली आहे. यासंदर्भात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच मोरे याने गावातील 70 वर्षीय तक्रारदाराला धमकावले होते. तक्रारदाराची स्वमालकीची जमीन असताना त्यावर ग्रामपंचायतीने आरक्षण असल्याचे दाखविले होते. हे आरक्षण रद्द करायचे असेल तर तक्रारदाराकडे दीड हजार चौरस फुटांचा प्लॉट द्यावा अशी मागणी करण्यात आली. या प्रकाराने तक्रारदार वृद्ध धास्तावला होता.

त्यानंतर सरपंच मोरे यांनी तक्रारदाराच्या घरी जाऊन तुम्हाला मला प्लॉट द्यावा लागेल. प्लॉट देण्यास नकार मिळाल्यावर दहा लाख रुपयांची लाच द्यावी लागेल. अन्यथा जमिनीच्या प्रकरणात न्यायालयाच्या खेट्या घालाव्या लागतील. ग्रामपंचायत कडून याबाबत न्यायालयात दावा करण्यात येईल, असे धमकावले होते.

त्यानंतर ग्रामपंचायतचे कारकून शांताराम बोरसे यांनी देखील तक्रारदाऱ्याला तसेच धमकी दिली. याबाबत आपण मध्यस्थी करून देऊ. आपण सरपंचाला दहा लाख रुपये द्यावे. दहा लाख रुपये देण्यास नकार दिल्यावर पाच लाख रुपयांवर तडजोड झाली. या पाच लाखातील दोन लाख रुपये मध्यस्थ सुरेश ठेंगे यांच्या घरी स्वीकारण्याचे ठरले होते.

यासंदर्भात तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार मध्यस्थ सुरेश ठेंगे यांच्या निवासस्थानी दोन लाख रुपये स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरपंच राजेंद्र मोरे आणि ग्रामपंचायत कारकून शांताराम बोरसे यांनाही अटक केली आहे. याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.

वरिष्ठ अधिकारी शर्मिला घारगे- वालावलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे आणि रूपाली मोरे, जगदीश बडगुजर यांनी ही कारवाई केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT