BJP Vs Shivsena: लोकसभा निवडणूक निकाल लागून अनेक महिने झाल्यानंतरही नंदुरबारमधील विजय-पराजयाचे कवित्व अद्यापही संपलेले दिसत नाही.लोकसभा निवडणुकीत मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची कन्या डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांचा पराभव झाला. हा पराभव शिवसेनेचे नेते, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यामुळे झाल्या असल्याचे बोलले जाते.
महायुतीत असताना शिवसेनेने आपल्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप गावित बाप-लेकींने केला होता. हिना गावितांचा पराभव का झाला? याचे उत्तर आज मिळाले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आज जाहीरपणे कबुली देत आपण काँग्रेसच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे सांगितले.
लोकसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेनेने युती धर्म पाळला नसून काँग्रेसच्या उमेदवाराला छुप्या पद्धतीने पाठिंबा दिले असल्याचे आरोप वारंवार भाजपाकडून केला जात आहे, मात्र आता शिंदेंची शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जाहीरपणे याची कबुली दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसने आमच्या उमेदवारांनाच पाठिंबा दिला पाहिजे, कारण आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता हे सत्य आहे. आम्ही मैदानात होतो लोकसभा निवडणुकीच्या वेळेस आम्ही भाजपला उमेदवार बदलण्यासाठी वारंवार विनंती केली होती, तरीदेखील भाजपने चुकीच्या उमेदवाराला तिकीट दिले. भाजपने लोकभावनेच्या आदर केला नाही, लोकसभा निवडणुकीत नंदुरबारसाठी उमेदवार बदलला असता तर काँग्रेसच्या उमेदवार निवडून आला नसता, असे स्पष्ट वक्तव्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे.
रघुवंशी हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. मंत्री गावित भाजपचे आहेत. हे दोघेही महायुतीचे सदस्य आहेत. मात्र नंदुरबारच्या राजकारणात हे दोघेही एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत.
नंदूरबार लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांचा काँग्रेसचे नवखे उमेदवार ॲड.गोवाल पाडवी यांनी १ लाख ५९ हजार १२० मतांच्या फरकाने पराभव करीत विजय मिळविला. लोकसभा निवडणूक निकाल लागून अनेक महिने झाल्यानंतरही नंदुरबारमधील विजय-पराजयाचे कवित्व अद्यापही संपलेले दिसत नाही.
आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuvanshi) यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात काम करीत,काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचे काम केल्यामुळेच महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांचा पराभव झाल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले होते. नंदुरबार येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला साथ दिल्याची कबुली रघुवंशी यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.