Bhaskarrao-Bhagare & Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhaskar Rao Bhagre: कांद्याचा संताप रस्त्यावर!, चांदवडमध्ये आज महामार्ग रोको; भगरे-वाजेंसह शेतकरी आक्रमक

Chandwad Onion Farmers Agitation NCP Bhaskarrao Bhagre criticizes aggressive central government-कांदा प्रश्नावर नाशिकचे खासदार आज मुंबई महामार्ग अडवणार, सरकारला कडक इशारा

Sampat Devgire

Chandwad Farmers' March: गेले दोन महिने कांद्याचा भाव कोसळला आहे. शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. यावर राज्य आणि केंद्रातील सरकार थातूरमातूर उपाय करीत असल्याने संतापाचे वातावरण आहे.  

आज होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील सरकारने एक हजार ५८० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. त्याचा कोणताही अनुकूल परिणाम झालेला नाही. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाराशे रुपये हमीभाव जाहीर केला होता. 

कांद्याचे भाव कोसळल्यावरही केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार उदासीन आहे. सरकारमधील स्थानिक मंत्री आणि नेते विधानपरिषद निवडणुकीच्या राजकारणात गुंतले आहे. याच्या तीव्र प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटले आहेत. 

कांद्याला भाव मिळावा म्हणून आज खासदार भास्कर भगरे आणि राजाभाऊ वाजे यांसह सर्वपक्षीय आंदोलन होत आहे. चांदवड येथे सर्वपक्षीय नेते शेतकऱ्यांसह मुंबईचा महामार्ग अडवणार आहे. त्यामुळे कांद्याचे राजकारण पुन्हा तापले आहे. 

हमीभाव जाहीर केल्याने काहीही परिणाम होणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्करराव भगरे यांनी सांगितले. त्यामुळे आजचे आंदोलन होणारच आहे. सरकारने कांदा उत्पादक शेतकरी काय म्हणतो हे समजून घ्यावे. 

केंद्राने जाहीर केलेला भाव अ दर्जाच्या एक टक्का कांद्यासाठी आहे. तो जास्तीत जास्त दोन लाख टन कांद्याला लागू होईल. कांद्याचे एकूण उत्पादन 170 लाख टन आहे. त्यामुळे केंद्र शासनाने जाहीर केलेला भाव म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे, असे खासदार भगरे म्हणाले. 

कांद्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. या प्रश्नावर राहुल येतील शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमधील संताप आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आज चांदवड येथे शेतकऱ्यांचे आंदोलन होत असल्याने त्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT