Bhaskar Bhagare News : कांदा प्रश्नावर खासदार भगरे संतापले; सत्ताधाऱ्यांना फक्त निवडणुकीचीच चिंता!

Onion Farmers Politics News : निवडणुकीच्या नशेतून नाशिकचे शेतकरी या सत्याधाऱ्यांना जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी दिला.
Bhaskar Bhagare
Bhaskar BhagareSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कांद्याला भाव नाही, मशागतीसाठी डिझेल नाही मात्र भाजप आणि सत्ताधारी विधान परिषदेच्या निवडणुकीत मस्त आहेत. सत्ताधारी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाचे नेते सध्या केवळ विधानपरिषद निवडणुकीचीच चर्चा करीत आहेत. निवडणुका जिंकण्याचे व्यसन त्यांना लागले आहे. निवडणुकीच्या नशेतून नाशिकचे शेतकरी या सत्याधाऱ्यांना जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी दिला.

नाशिक जिल्ह्यात कांद्याला मातीमोल भाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कांदा खरेदीची घोषणा दहा दिवसांपूर्वी केली. प्रत्यक्षात मात्र त्याची कुठेही कारवाई होताना दिसत नाही. यामध्ये नाफेड संस्थेची मोठी जबाबदारी असूनही ते काहीच करीत नाहीत. राज्य शासनाचे प्रशासन यावर काहीही उपायोजना करायला तयार नाहीत, असा आरोप यावेळी खासदार भगरे यांनी राज्य सरकारवर केला.

Bhaskar Bhagare
Onion Price Issue : कांदा उत्पादक शेतकऱ्याबाबत बावनकुळेंचं महत्वाचं विधान : ‘सरकार विचार करतंय...मुख्यमंत्री सकारात्मक’

भाजपचे (BJP) केंद्र सरकार आणि त्यांच्या नाफेडसह विविध यंत्रणाचे याकडे दुर्लख होत आहे. या सर्व प्रकाराकडे डोळे बंद करून बसले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार कोण? या पार्श्वभूमीवर शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

Bhaskar Bhagare
Ambadas Danve News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेने रोखला समृद्धी महामार्ग!

सध्या कांद्याला भाव नाही. खरिपाच्या मशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट कोसळले आहे. सत्ताधारी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) व पक्षाचे सर्व नेते आणि आमदार मात्र फक्त निवडणुका कशा जिंकायच्या यातच व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Bhaskar Bhagare
PM Modi Gujarati letter : मोदींना मराठीतून वेदना समजणार नाहीत? कांदा दरघटीवर संतप्त शेतकरी पुत्राचे गुजरातीत पत्र, राज्यभर चर्चेला उधाण

शेतकरी आणि जनतेशी त्यांना बांधीलकी आहे की नाही? असा प्रश्न पडतो. या पार्श्वभूमीवर येत्या 26 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून या सरकारला जाब विचारणार आहे, असा इशारा खासदार भगरे यांनी दिला. त्यामुळे कांदा प्रश्नावर विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.

Bhaskar Bhagare
Ambadas Danve News : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेने रोखला समृद्धी महामार्ग!
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com