Ganesh Nimbalkar News: चांदवड, येवला, मालेगावसह नाशिक जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न तीव्र झाला आहे. शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. यासंदर्भात चांदवड येथे सर्वपक्षीय नेत्यांनी उपोषण केले. मात्र आश्वासन देऊनही भाजप सरकारने काहीही निर्णय घेतलेला नाही.
कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. प्रश्नावर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आंदोलन मागे घेण्यासाठी आश्वासन दिले. मात्र अद्याप यासंदर्भात काहीही ठोस निर्णय झालेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात प्रहार संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातही केला. या प्रश्नावर ठोस निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मतदारसंघात सह जिल्ह्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली होती. त्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. पाचशे रुपये प्रतिक्विंटल अनुदानाची मागणी करण्यात आली.
कांदा प्रश्नावर सत्ताधारी पक्ष बोल घेवडेपणा करीत आहे. भाजपच्या सरकारने आपल्या धोरणातून शेतकऱ्यांना संकटात लोटली. आता शेतकरी असहाय्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका प्रहार संघटनेचे नेते गणेश निंबाळकर यांनी केली आहे.
कांदा उत्पादकांचा प्रश्न तीव्र बनलेल्या तालुक्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे आमदार आणि लोकप्रतिनिधी सत्तेत आहेत. येवल्यात मंत्री छगन भुजबळ प्रतिनिधित्व करतात. मालेगावला कांदा उत्पादक रस्त्यावर उतरला असून शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा तो मतदार संघ आहे. या नेत्यांना श्री निंबाळकर यांनी गंभीर प्रश्न केला आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार सत्तेवर आहे. त्याने कांदा उत्पादक आणि मका उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधात धोरणे राबविली जातात. त्यामुळे या दोन्ही पिकांना सध्या भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाला मोबदला नाही.
कांदा आणि मका या पिकांतून राज्य शासन योजना राबवते त्यापेक्षा अधिक रोजगार आणि लाभ मागासवर्गीय आणि अन्य मजुरांना मिळत असतो. शेतकऱ्यांना मेहनत करूनही हाती काही पडत नाही. या संदर्भात अनेक घोषणा करूनही भाजपने प्रत्यक्षात कोणतीही कृती केली नाही. या धोरणातून भाजप सरकार शेतकऱ्यांना संकटात लोटत आहे. या संदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास नव्या आंदोलनाला सरकारला सामोरे जावे लागेल, इशारा निंबाळकर यांनी दिला आहे.
-------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.