Ajit Pawar | Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : कृषी खातं तुम्ही घ्या, अजित पवारांचा मला खूप आग्रह होता..इतकं सगळं घडल्यानंतर भुजबळांचा गौप्यस्फोट

Chhagan Bhujbal : अॅड. माणिकराव कोकाटे यांच्याकडून अखेर कृषी खाते काढून घेण्यात आले असून राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडे ते दिले आहे. यादरम्यान मंत्री छगन भुजबळांनी मोठा खुलासा केला आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना विधान परिषद सभागृहात रमी खेळतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले. राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटेंचा व्हिडीओ उघड केला. यानंतर विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

त्यानंतर आता कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषिमंत्री करण्यात आले आहे. तर भरणे यांच्याकडे असलेले क्रीडा व युवक कल्याण खाते कोकाटेंना देण्यात आलं आहे. या सगळ्या घडामोडी सुरु असताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मंत्री भुजबळ हे नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कृषी खात्याची जबाबदारी स्विकारण्याची ऑफर दिली होती. हे खातं चांगल आहे, मोठं आहे आणि तुम्ही ते घ्या असा आग्रह आपल्याला अजित पवारांनी केला होता असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.

भुजबळ म्हणाले, ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये आलो. तेव्हा अजित पवार यांनी त्यांच्याकडे अर्थखाते घेतले होते. त्यानंतर उरलेल्या खात्यांची यादी अजित पवारांनी माझ्यासमोर ठेवली. त्यातून हवे ते खाते तुम्हाला घ्या म्हणून सांगितले. त्यावेळी आम्ही चर्चा करत असताना कृषी खातं तुम्ही घ्या म्हणून अजित पवारांनी मला खूप आग्रह केला असा खुलासा भुजबळांनी केला आहे.

भुजबळ पुढे म्हणाले, अजित पवारांनी जरी मला आग्रह केला तरी माझं मत असं होत की, बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिलेला आहे. शेतकऱ्यांबरोबर राहिलेला आहे. त्याला या खात्याविषयी जास्त माहिती आहे. त्याला हे खातं दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे मी ग्रामीण भागातील लोकांना कृषी खातं द्या असे सांगितले. कारण माझे अर्ध्यापेक्षा अधिक आयुष्य मुंबईत गेलं आहे. मी शेतकरी प्रश्नावर कायम त्यांच्यासोबत मागे उभे राहतो. पण, शेतीविषयाची बारीकसारीक माहिती देणारी माणसं ग्रामीण भागात असतात. ते त्या पदाला अधिक चांगला न्याय देऊ शकतात असं भुजबळ म्हणाले.

यावेळी कृषी खात्याची नव्याने जबाबदारी घेतलेल्या दत्ता भरणे यांच्याविषयी भुजबळ बोलले. म्हणाले, दत्ता मामा हे ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे काही अडचण येण्याची गरज नाही. प्रत्येक खातं हे महत्वाचं आहे. प्रत्येक खातं हे चांगलं आहे. आपण कसे काम करतो यावर ते अवलंबून असते. त्यामुळे भरणे हे ग्रामीण पार्श्वभूमीचे आहेत ते कृषी खात्याला न्याय देतील. अशा माणसांना शेतकऱ्यांच्या समस्या अधिक चांगल्या प्रकारे समजतात असं भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT