BJP Politics : 'संपूर्ण महाराष्ट्र भोंगे मुक्त करायचा', भाजप नेत्याने कंबर कसली

Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र भोंगे मुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्याच दृष्टीकोनातून ते राज्यातील विविध शहरांतील पोलिस अधिकाऱ्यांच्या भेटी घेत आहे. संवाद साधत आहे
Illegal loudspeakers
Illegal loudspeakersSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra News : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भोंगामुक्त महाराष्ट्र अभियानाला सुरुवात केली आहे. या अभियानाला गती देण्यासाठी त्यांनी नाशिक दौरा केला व नाशिकच्या पोलिस आयुक्तांची भेट घेतली. मुंबई भोगेंमुक्त झाली आहे, आता संपूर्ण महाराष्ट्र भोंगेमुक्त करायचा आहे अशी घोषणा त्यांनी केली.

गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भोंग्याच्या संदर्भात भूमिका घेतली होती. मनसेने धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यासाठी आंदोलने केली होती. त्यावरुन चांगलच राजकारण तापलं होतं. आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हा विषय हाती घेतला असून, संपूर्ण राज्य भोंगे मुक्त करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे.

सोमय्या यांनी याविषयावर गुरुवारी (दि. ३१ ) नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र आता भोंगे मुक्त करायचा आहे. मुंबई तर भोंगेमुक्त झाली आहे. या संदर्भात छत्रपती संभाजी नगर, नाशिक पोलिस आयुक्त यांची भेट घेतली. त्यानंतर पुढे येत्या दोन दिवसांत पुण्यासह राज्यातील काही शहरांमध्ये जाऊन भोंगेमुक्त शहरासाठी पोलिस प्रमुखांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Illegal loudspeakers
Supriya Sule : रमी खेळणाऱ्यांना क्रीडा खातं देणं 'विनोद', कोकाटेंच्या खातेबदलावर सुप्रिया सुळेंचा संताप

यावेळी नाशिकमधील भोंगे हटविण्यासाठी त्यांनी पोलिस आयुक्तांशी चर्चा केली. त्यावर नाशिक शहर पोलिसांनी जवळपास सर्वच भोंग्यावर प्रतिबंध लावला आहे. हळूहळू भोंगे उतरवण्याचे काम सुरु असून येत्या दहा दिवसांत आणखी जिथे कुठे भोंगा राहिला असेल तो बंद करुन नाशिक शहर भोंगेमुक्त करण्याचे आश्वासन आयुक्त कर्णिक यांनी दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Illegal loudspeakers
Ajit Pawar Politics : कोकाटेंची उचलबांगडी, अजित पवारांनी मारले एका दगडात दोन पक्षी

दरम्यान मालेगाव बॉम्बस्फोट निकालावर त्यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींची निर्दोष मुक्तता होणारच होती. त्यांना या प्रकरणात कॉंग्रसने गोवले होते. देशात भगवा दहशतवाद पसरविण्याचं पाप कॉंग्रेसने केलं. या निकालातून राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी धडा घ्यायला हवा. या निकालामुळे ते उघडे पडले आहेत. अशी टीका सोमय्या यांनी केली. तसेच काही वर्षांपासून हिरवे वस्र परिधान केलेल्या उद्दव ठाकरे सेनेला मालेगाव च्या या निकालानंतर आतातरी हिंदुत्वाची जाणीव होईल असही सोमय्या म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com