Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: कंत्राटी नोकरभरतीच्या प्रश्नावर भुजबळांनी गप्प राहणेच पसंत केले!

Contract Employment Issue : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची कंत्राटी नोकरभरतीच्या प्रश्नावर राजकीय कोंडी झाली.

Sampat Devgire

Nashik Latest News : राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने कंत्राटी नोकरभरतीचा अध्यादेश रद्द केला. तसे करताना त्यांनी त्याचे सर्व दोषारोपण महाविकास आघाडी सरकारवर केले. त्यामुळे बाजूने बोलावे की विरोध करावा, अशी सत्ताधारी पक्षाला पाठींबा दिलेल्या अनेक नेत्यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे भुजबळांचाही या विषयावर गोंधळ झाला. (Chhagan Bhujbal didn`t reply on Contract labour issue)

मंत्री भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी कंत्राटी नोकरभरतीच्या प्रश्नावर बोलणे टाळले. राज्य सरकारने (Maharashtra) नुकताच विरोधकांच्या दबावामुळे हा निर्णय परत घेतला. यावेळी भाजपचे (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर त्याचे खापर फोडले होते.

उपमुख्यमंत्री बोलले, विषय संपला

शनिवारी अमृतकलश यात्रेच्या कार्यक्रमात मंत्री भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी कंत्राटी भरतीवरील प्रश्नावर मंत्री भुजबळ यांनी बोलण्यास नकार दिला. उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केले, की यापुढे कंत्राटी भरती होणार नाही. तेव्हा हा विषय आता संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यभर गाजत असणाऱ्या ड्रग्जनिर्मिती प्रकरणावर बोलताना भुजबळ यांनी ड्रग्ज प्रकरणावर राजकारण होता कामा नये, असे सांगितले. येथे बनणारे ड्रग्ज देश-विदेशात कुठे जात होते, याचा तपास व्हायला हवा. त्या कारखान्यात जे काही बनत होते, त्याबाबत सर्वसामान्यांनाही माहिती नाही.

तेथे काय बनत होते, ते कुठे जात होते याबाबतची तपासणी करण्याचे काम फूड ॲण्ड ड्रग्ज विभागाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या ड्रग्ज प्रकरणातील आरोपी ललित पाटील कोणत्या पक्षात होता, हेही आपणास माहिती नाही, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे.

अखेरच्या स्तरापर्यंत पोलिसांनी याचा शोध घ्यायला हवा. ड्रग्ज कुठपर्यंत पोहोचविले होते, याची माहिती मिळवून ही साखळी तोडायला हवी, अशी अपेक्षा भुजबळ यांनी या वेळी व्यक्त केली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, आमदार दिलीप बनकर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT