Shivsena Nashik News : ‘ड्रग्ज’मुळे शिवसेनेला मिळाली नवी ताकद!

Drugs issue in Nashik : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जोमाने कामाला लागली
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : ड्रग्ज माफीया ललित पाटील पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्यानंतर तसेच मुंबई पोलिसांनी नाशिकला ड्रग्जचा कारखाना शोधल्याने नाशिकचे राजकारण पेटले. त्याचा पुरेपुर लाभ घेत शिवसेनेने याविरोधात जोरदार आवाज उठवला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठी शिवसेनेला जोरदार उभारी मिळाली आहे.(Shivsena Uddhav Thackeray group took a fatal blow due to Drugs issue)

शिवसेनेने (Shivsena) ड्रग्ज प्रकरणी थेट पालकमंत्र्यासह (Dada Bhuse) विविध आमदारांवर (Eknath Shinde) आरोप केले आहेत. हा अत्यंत गंभीर विषय असल्याने शिवसेनेच्या आरोपानंतर सत्ताधारी पक्ष बॅकफूटवर गेले आहेत.

Uddhav Thackeray
Chhagan Bhujbal News : मराठा आरक्षणावरून भुजबळांना मोठा धक्का; नाराज खंद्या समर्थकाने सोडली साथ  

गेल्या पावणेदोन वर्षांपासून महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका रेंगाळल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांअभावी मरगळ आलेल्या राजकीय पक्षांना नाशिकमध्ये सापडलेले एमडी ड्रग्ज प्रकरणाने आरोप-प्रत्यारोपांमुळे रंगत आली आहे.

आगामी महापालिका, लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकीतदेखील ड्रग्जचाच विषय प्रमुख राहण्याची शक्यता आहे. प्रमुख विरोधक असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा प्रयत्न हा मुद्दा केंद्रस्थानी रहावा असाच आहे.

राजकीय पक्षांच्या या ड्रग्ज विषयावरील आक्रमकतेमुळे तसेच आरोप- प्रत्यारोपांच्या फैरींसाठी दारूगोळा भरण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. दसरा मेळाव्यात नाशिक हेच केंद्रस्थानी राहील तेथूनच नाशिकच्या आगामी निवडणुकांच्या प्रचाराची दिशा ठरणार आहे. दोन्ही सेनेत ललित पाटीलच्या प्रवेशावरून चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने या संधीचा पुरेसा लाभ घेत मोर्चा काढला. त्यामुळे त्या पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी सक्रीय झाले आहेत.

Uddhav Thackeray
Manoj Jarange Patil Speech : 'सरकारला आंदोलन धुळीत मिसळायचंय, पण मी खानदानी मराठा..' ; जरांगे इरेला पेटले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com