Hemant Godse, Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Politics : अमित शहांच्या उमेदवाराची माघार हेमंत गोडसेंना पचनी पडणार का? नाशिकमध्ये नवा तेढ

Nashik Lok Sabha Constituency : भाजपच्या तीनही आमदारांनी वरिष्ठांची भेट घेऊन खासदार गोडसेंच्या उमेदवारीला प्रखर विरोध केला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही नाशिकवर आमदारांच्या संख्येनुसार दावा केला होता.

Sampat Devgire

Nashik Lok Sabha Politics : नाशिक मतदारसंघातील महायुतीचा गंभीर पेच आज सुटला. मंत्री छगन भुजबळ यांनी येथून माघार घेतली आहे. त्यामुळे आता ही जागा शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळेल. मात्र भाजपचा डाव उधळणाऱ्या गोडसेंना उमेदवारी मिळेल का? हा नवा पेच निर्माण होण्याची शक्यता असल्याने गोडसेंची धाकधूक कायम आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal हे प्रबळ उमेदवार होते. त्यांची उमेदवारी थेट भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी सूचवली होती. मात्र या उमेदवारीला शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रखर विरोध केला. महायुतीतील या दोन घटक पक्षांमध्ये नाशिकच्या जागेवरून दीर्घकाळ वाद सुरू होता. आज मंत्री भुजबळ यांनी माघार घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे एकीकडे जागेचा तिढा संपला असे दिसते. मात्र असे असतानाच यातून मोठा राजकीय पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

नाशिक मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे Shrikant Shinde यांनी तीन आठवड्यापूर्वीच खासदार हेमंत गोडसे उमेदवार असतील. त्यांना आपल्याला पुन्हा संसदेत पाठवायचे आहे, अशी घोषणा केली होती. त्यामुळे खासदार गोडसे यांनी देखील मीच उमेदवार असेल, या अपेक्षेने प्रचाराला देखील सुरुवात केली. मात्र नेमकी त्यावरूनच मोठी ठिणगी पडली. महायुतीच्या तीन्ही घटक पक्षांमध्ये मोठे राजकीय घमासन झाले.

भाजपच्या तीनही आमदारांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांसह वरिष्ठांची भेट घेऊन खासदार गोडसेंच्या उमेदवारीला प्रखर विरोध केला होता. नाशिकच्या जागेवर फक्त भाजपचा अधिकार आहे. येथे तीन आमदार आणि शंभरहून अधिक नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे मतदारसंघ भाजपालाच हवा, असा आग्रह धरला होता. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही नाशिकवर आमदारांच्या संख्येनुसार दावा केला होता.

महायुतीच्या तिन्ही पक्षांना नाशिकची जागा हवी होती. आता या वादात शिंदे गटाची सरशी झाली आहे. मात्र ही सरशी कितपत आणि किती काळ टिकेल, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महायुतीचे अन्य पक्ष खासदार गोडसेंच्या Hemant Godse उमेदवारीला प्रखर विरोध करीत होते. आता ते गोडसेंच्या प्रचारात कितपत सहभागी होतील. सहभागी झाल्यास ते मनापासून काम करणार का, अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

राज्यातील प्रमुख ओबीसी नेते म्हणून भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी त्यांचे नाव सूचवले होते. त्याला अनेकदा दुजोरा देखील मिळालेला आहे. मात्र शिंदे गटाने याबाबत शेवटच्या टप्प्यात कडक भूमिका घेतली. त्यामुळे भाजपचे मनसुबे अर्धवट राहिले. आता अमित शहा यांच्या मनातील उमेदवाराला विरोध करणाऱ्या खासदार गोडसे यांच्याबाबत भाजप वेगळी भूमिका घेण्याची शक्यता आहे. खासदार गोडसे यांना या दबावामुळे भाजप उमेदवारी मिळू देईल का, अशी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांच्यापुढील संकट टळले नाही, असेच दिसून येत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT