Lok Sabha Election 2024 : आजी-माजी आणि इच्छुकांना 'सतेज' नेतृत्वाची भुरळ; लोकसभेत महापालिकेसाठी फिल्डिंग

Kolhapur Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व सतेज पाटील, तर महायुतीचे नेतृत्व धनंजय महाडिक, हसन मुश्रीफ करत आहेत.
satej patil
satej patilsarkarnama

कोल्हापूर लोकसभा निवडणूक ( Kolhapur Lok Sabha Election 2024 ) सर्वच बाबतीत अटीतटीची बनली आहे. शिवाय महाविकास आणि महायुती आघाडीमधील नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची बनली आहे. या लोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या पेरणीबरोबरच आता कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील आजी-माजी आणि इच्छुकदेखील येणाऱ्या निवडणुकीसाठी फिल्डिंग लावण्याच्या तयारीत आहेत.

नुकतेच महायुतीकडून जवळपास 106 माजी नगरसेवकांनी खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांना पाठिंबा दिला, तर महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांना जवळपास 228 माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. आगामी येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत आजी-माजी नगरसेवकांना 'सतेज' नेतृत्वाची भुरळ पडली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व काँग्रेसचे आमदार सतेज ( बंटी ) पाटील ( Satej Patil ) हे करत आहेत, तर महायुतीचे नेतृत्व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik ) आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ ( Hasan Mushrif ) हे करत आहेत. कोल्हापूर महानगरपालिका परिक्षेत्र हे कोल्हापूर उत्तर विधानसभा आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विखुरले गेले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनेदेखील कंबर कसली आहे. कोल्हापूर शहरात मताधिक्य मिळवण्यासाठी चढाओढ निर्माण झाली आहे. सध्या महापालिका निवडणूक लांबणीवर पडली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक राज महापालिकेवर आहे. त्यामुळे इच्छुकही कामाला लागलेत. अशातच इच्छुकांना आणि माजी नगरसेवकांना हाताशी धरून लोकसभा निवडणुकीचे मैदान मारण्याचे संकल्प या नेतृत्वाचा आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांना गोळा करण्याची स्पर्धा जणू महाविकास आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये लागली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीचे दोन्ही गट, शिवसेनेचे दोन्ही गट, भाजप, ताराराणी आघाडी या सर्वच पक्षांतील माजी नगरसेवकांचा समावेश आहे. माजी नगरसेवकांना प्रभागात विकासकामांसाठी निधीची ग्वाही दिली जात आहे. जवळपास महाविकास आघाडीकडे 228 माजी नगरसेवकांचा पाठिंबा आहे. महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांचे नियोजन, यंत्रणा आणि कार्यकर्त्यांचा राबता घरोघरी आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील इच्छुकांना सतेज पाटील यांची भुरळ पडणे साहजिकच आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाने महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पालकमंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार खासदार मंडलिक यांच्या प्रचारात उतरली आहे. यात माजी नगरसेवकांचाही समावेश आहे; मात्र राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष व स्थायी समिती सभापती राजेश लाटकर हे समर्थक माजी नगरसेवकांसह शाहू महाराज यांचा प्रचार करत आहेत. लाटकर यांनी महाडिक गटातील स्थानिक संघर्षामुळे आणि कुटुंबाला राष्ट्र सेवा दलाची पार्श्वभूमी असल्याने शाहू महाराज यांच्याबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे, तर इतर माजी नगरसेवकांनी अजित पवार गटातील इतरांशी मतभेद असल्याने शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. काँग्रेसचे माजी सभागृह नेते दिलीप पोवार हे आता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासोबत आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत ते शिवसेनेत आहेत; परंतु काँग्रेसच्या माजी नगरसेविका आणि त्यांच्या पत्नी सरस्वती पोवार यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे.

satej patil
Lok Sabha Election 2024 : मविआला शेट्टींचा अन् महायुतीला पाटलांचा धसका; मत विभाजनानं कोणाचा होणार 'गेम'?

माजी महापौर कांचन कवाळे आणि शिवाजी कवाळे हे काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे ते शाहू महाराज यांच्या प्रचारात आहेत. तर, माजी महापौर कादंबरी कवाळे आणि माजी स्थायी समिती सभापती संदीप कवाळे हे मुश्रीफ यांच्यासोबत असल्याने ते महायुतीच्या प्रचारात आहेत. तर काही नगरसेवकांनी झाकली मूठ सव्वा लाखाची हेच धोरण ठेवले आहे. कौटुंबिक संबंध, मैत्रीपूर्ण संबंध जपत अनेक नगरसेवकांनी मौनच ठेवले आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

satej patil
Raju Shetti News : हातकणंगलेमध्ये काड्या करण्यातच कारखानदार व्यस्त; राजू शेट्टींचा निशाणा कोणावर ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com