Chhagan Bhujbal & Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: भुजबळ म्हणाले, 'ते' एकट्या दुकट्याचे काम नाही!

Chhagan Bhujbal; Bhujbal reply on Sanjay Raut allegation of "Varsha" residence-मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगे पुरली हा वाद चर्चेत आला आहे.

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News: शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाबत केलेल्या विधानाने नवा वाद उभा राहिला आहे. या संदर्भात माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण थांबणार की त्याची चर्चा सुरूच राहणार याविषयी उत्सुकता आहे.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात स्थिर सरकार आहे. असे असतानाही मुख्यमंत्री फडणवीस वर्षा निवासस्थानी जाण्यास टाळत आहे. यामागे जादूटोणा आणि भानामती हा प्रकार असल्याचे ते म्हणाले होते.

त्याच्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या नसत्या तरच नवल. यावर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव ओढले गेले आहे. माजी मुख्यमंत्री शिंदे यांनी गुवाहाटी येथे कामाख्या देवीला नवस केला होता. तेथे रेड्याचा बळी देण्यात आला होता. त्या रेड्याची शिंगे वर्षा निवासस्थानी पुरण्यात आली आहेत. असा खळबळ जनक दावा चर्चेत आहे.

यावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक येथे पत्रकारांनी राऊत यांच्या आरोपाविषयी त्यांना प्रश्न केला. याबाबत माजी मंत्री भुजबळ यांनी आपल्याला फारसे माहिती नाही, असे सांगण्याचा प्रयत्न केला.

याबाबत माजी मंत्री भुजबळ म्हणाले, कामाख्या देवीला रेडे कापले. त्यांचे शिंग वर्षा बंगल्याच्या आवारात खोदकाम करून पुरले आहेत, असे तेथील कामगार सांगतात. असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राऊत यांनी केला आहे. मात्र माझ्या मते एकटा माणूस ही शिंगे गाडू शकत नाही. कुठे गाडली असतील तर, ते काढावेत. कारण ते गाडण्यासाठी दहा ते बारा मनसे नक्की लागली असतील. अशी सूचक प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली.

या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला होता. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या विविध मंत्र्यांनी राऊत यांच्या या आरोपावर अतिशय आक्रमक होत प्रतिक्रिया दिल्या होत्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी केव्हा राहायला जाणार हे सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र अद्यापही चर्चा थांबलेली नाही असेच दिसते आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT