Dhananjay Munde Politics: वारकरी संतापले, ‘नामदेवशास्त्री, हे वारकरी संप्रदायाला शोभणारे नाही’

Namdevshastri; Supporting the controversial Munde, Namdevshastri insulted the Warkari sect-वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे यांचे 'भगवानगड'चे नामदेव शास्त्री यांची पाठराखण केली होती.
Amar Thombare & Namdev Shashtri
Amar Thombare & Namdev ShashtriSarkarnama
Published on
Updated on

Namdev Shastri News: ‘भगवानगड’चे महंत नामदेवशास्त्री यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली होती. हे प्रकरण आता त्यांना चांगलेच त्रस्त करू लागले आहे. नाशिकच्या वारकऱ्यांनी याबाबत त्यांचा निषेध केला आहे.

मस्साजोग (बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच गाजते आहे. या प्रकरणाशी निगडित खंडणी गुन्ह्यात वाल्मीक कराड यांना अटक करण्यात आली आहे. वाल्मीक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे हे भागीदार आहेत. या प्रकरणावरून मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी दबाव वाढत आहे.

Amar Thombare & Namdev Shashtri
Shirdi Politics : 7000 नव्हे, तर त्यापेक्षाही जास्त मतदार, सर्व मॅनेज केलं; प्रभावती घोगरेंच्या गंभीर आरोपांनं खळबळ

यासंदर्भात ‘भगवानगड’चे महंत नामदेव शास्त्री यांनी मंत्री मुंडे यांची पाठराखण केली होती. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहे. आता त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थेचे विश्वस्त अमर ठोंबरे यांनीही नामदेव शास्त्री यांचा कठोर शब्दात निषेध केला आहे.

Amar Thombare & Namdev Shashtri
NCP Politics : अजितदादांचा शिलेदार म्हणतोय, अहिल्यानगर नावाला काही 'जिहादी' लोकांचा विरोध

अमर ठोंबरे हे वारकरी संप्रदायातील सक्रिय पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादी अध्यात्मिक व वारकरी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आहेत. ते म्हणाले, नामदेव शास्त्री यांची वारकरी संप्रदायाचे थोर निरूपणकार म्हणून ओळख आहे. ज्ञानेश्वरी आणि संत तुकोबारायांची गाथा या संतवाड्मयांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे.

‘भगवानगड’चे नामदेव शास्त्री यांना अध्यात्म आणि घडलेल्या घटनांचा आध्यात्मिक बोध होणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी वादग्रस्त मंत्री मुंडे यांची बाजू घेत त्यांची पाठराखण केली. एका भ्रष्टाचारी मंत्र्यांची पाठराखण करणे वाईट आहे. हे निश्चितच वारकरी संप्रदायाला शोभणारे नाही.

श्री ठोंबरे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वीही घडले आहेत. तात्कालीन विचार केल्यास कल्याणच्या चिमुकलीवर झालेला अत्याचार असो वा कोपर्डी येथील बलात्कार प्रकरण अशा अनेक प्रकारात अत्याचार झाले आहेत. महाराष्ट्राने त्यावर खेद व्यक्त केला आहे. मात्र यापैकी एकाही प्रकरणात निषेधाचा सूर महंत नामदेव शास्त्री यांनी आळवला नव्हता. मात्र मुंडे प्रकरणात त्यांनी अचानक उडी घेऊन त्यांनी पाठराखण केली आहे, याचे अनेकांना आश्चर्य वाटते.

गेले काही दिवस खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड यांचे नाव आरोपी म्हणून घेतले जात आहे. या प्रकरणाचा थेट संबंध सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर आणि अमानुष हतेशी जोडला जात आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा व सर्व आरोपींना फाशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.

या संदर्भात नामदेव शास्त्री यांनी काहीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आता कोणाच्या पायावर डोके ठेवावे, असे चरण शिल्लक राहिले नाही. कुणाच्या गळ्यात सन्मानाने हार घालावा, असा गळा ही शिल्लक राहिलेला नाही, असे म्हणण्याची वेळ संप्रदायावर आलेली आहे.

या प्रकरणात नामदेव शास्त्री यांनी अध्यात्म आणि माणुसकीचा विचार केला पाहिजे होता. तो विचार मनात ठेवून तातडीने झाल्या प्रकाराबद्दल क्षमा मागितली पाहिजे. त्यांनी माफी मागावी. अन्यथा प्रसंगी वारकरी त्यांच्या विरोधात आंदोलन देखील करतील, असा इशारा श्री ठोंबरे यांनी दिला आहे.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com