Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbhmela Politics: धक्कादायक.... महायुतीच्या कोणत्या नेत्याला आहे कुंभमेळ्याच्या टेंडरमध्ये आहे रस?

Chhagan Bhujbal; Chhagan Bhujbal has stripped BJP of its clothes, everyone's attention is only in the tenders -महायुतीच्या नेत्यांनीच कुंभमेळ्यातील गोंधळावर मंत्र्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले

Sampat Devgire

Sinhasth Kumbhmela News: नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला आहे. मात्र राज्य शासनाकडून त्याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. कुंभमेळ्याच्या विकास आराखड्याचा प्रश्न आता महायुतीतच राजकीय आरोप प्रत्यारोपांचा विषय होऊ लागला आहे.

सध्या महापालिका आणि राज्य शासनाचे अन्य विभाग यांच्यात सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकास आराखडा कसा फुगवता येईल, हा प्रयत्न दिसतो. पालकमंत्र्यांची रखडलेली नियुक्ती त्यात अडचणी आणत आहे. यासंदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेऊन या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

संदर्भात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी कोणाचेही नाव न घेता थेट प्रश्न उपस्थित केला आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे नेमके नियोजन आणि सुविधा याचा फारसा विचार झालेला नाही. आकडे फुगवून निविदा तयार करणे आणि त्या कामांचे टेंडर यातच सगळ्यांना रस असल्याचे सुचक विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.

कुंभमेळ्यासाठी नवीन बाह्यवळण रस्ता करण्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच जाहीर केले होते. हा रस्ता जवळपासकाही हजार कोटी रुपये खर्चाचा असल्याचे बोलले जाते. त्यासाठी भूसंपादन आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया करण्यासाठी पुरेसा वेळ आहे का? याचाही विचार कोणी केलेला दिसत नाही. त्यामुळेच कुंभमेळ्यासाठी रस्ता की फक्त रस्त्याच्या निविदा असा संभ्रम आहे.

या संदर्भात माजी उपमुख्यमंत्री भुजबळ यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारी संदर्भात शंका उपस्थित केली आहे. नवीन बाह्य वळण रस्ता नियोजन झाले आहे. त्याचे भूसंपादन केव्हा होणार? त्याला निधी कधी व कोण देणार? कामाला सुरुवात केव्हा होणार? काम कधी पूर्ण होणार हे काहीच निश्चित नाही. उपस्थितीत कुंभमेळ्यासाठी यापूर्वी केलेले आणि शहरालगत पुरेसे रस्ते उपलब्ध आहेत. त्याचा विसर पडलेला दिसतो.

महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळासाठी मोठा आराखडा तयार केला आहे. आखड्यातील कामे मिळवण्यासाठी काही कंत्राटदारांनी रिंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. हे सर्व मुंबईत मॅनेज केले जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा महायुतीच्या नेत्यांमध्येच वादाचा आणि आरोप प्रत्यारोपांचा विषय ठरला आहे. त्याने महायुतीच्या एका नेत्यानेच राज्य सरकारचे वस्त्रहरण केले. त्या दृष्टीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यासंदर्भात महापालिकेच्या विकास आराखडयाकडेही याबाबत लक्ष वेधण्यात आले आहे. पालिकेने सोळा हजार कोटी रुपयांचा आराखडा केला होता. त्यातील अनेक अनावश्यक कामे विभागीय आयुक्तांनी रद्द केली. नंतर हा आराखडा थेट निम्म्यावर आला. अनेक कामे वादग्रस्त आहेत. महापालिकेच्या या कामकाजाबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. कुंभमेळा कसा होतो याचे चिंता अनेकांना सत्तावू लागली आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT