Chhagan Bhujbal Politics: छगन भुजबळ का म्हणाले, "शरद पवारांना कळते केव्हा पाठिंबा द्यायचा केव्हा राजीनामा मागायचा"

Chhagan Bhujbal; Sharad Pawar knows when to support and when to ask for resignation-शिवसेना नेते संजय राऊत यांच्या शरद पवार विषयी वक्तव्याला भुजबळ यांचा टोमणा
Chhagan Bhujbal
SarkarnamaChhagan Bhujbal
Published on
Updated on

Chhagan Bhujbal News: पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून शिवसेना ठाकरे पक्षाने केंद्र सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे. या संदर्भात संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याबाबतही विधान केले होते. त्याला छगन भुजबळ यांनी सुचक शब्दांत राऊत यांना उत्तर दिले आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकारला प्रश्न केला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यासंदर्भात केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. त्याबाबत शिवसेना ठाकरे पक्षाचे राऊत यांनी नापसंती व्यक्त केली.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal : कोकाटेंच्या कारभारामुळे नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकाचा राजीनामा? जुना वाद ताजा असतानाच भुजबळ पुन्हा भिडले

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागायला हवा होता. त्यानंतर सरकारला पाठिंबा द्यायला हवा होता. असे खासदार राऊत म्हणाले होते. शिवसेना नेते राऊत यांनी यापुर्वीही पहेलगाम दहशतवादी हल्ल्यावरून केंद्रावर टिका केली होती.

Chhagan Bhujbal
Narayan Patil meets Ram Shinde : राम शिंदे राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत; पवारसाहेबांच्या आमदारानं घेतली भेट, बंद दाराआड दोघांमध्ये बरचं काही शिजलं

या संदर्भात छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. शरद पवार हे देशातील जेष्ठ राजकीय नेते आहेत. त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले आहे. माजी संरक्षण मंत्री देखील आहेत. त्यामुळे त्यांना देशाचे प्रश्न कळतात. तेव्हा राजीनामा मागायचा आणि केव्हा पाठिंबा द्यायचा हे शरद पवार यांना चांगले ठाऊक आहे, या शब्दात संजय राऊत यांना त्यांनी उत्तर दिले.

आज आपण केंद्र शासनाला दहशतवादी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सर्व प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे. हा पाठिंबा म्हणजे आपल्या सैन्याला, हवाई दलाला आणि नौदलाला पाठिंबा आहे. लढणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी आपण सर्व उभे आहोत याचे ते प्रतीक आहे. हे समजून घेतले पाहिजे.

श्री भुजबळ म्हणाले, पहेलगाम हल्ल्यानंतर कोणी कोणावर काही टीका केली, याला फार महत्त्व देण्याची गरज नाही. संदर्भात काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ही प्रत्येकाने समजून घ्यावे. फारूक अब्दुल्ला काय म्हणाले हे देखील लक्षात घेतले पाहिजे. आपण त्यांच्यापासून बोध घेतलेला बरा.

पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सबंध काश्मीरमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ठिकठिकाणी काश्मिरी नागरिकांनी मोर्चे काढून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. सबंध काश्मीर खोरे एकमुखाने भारताच्या पाठीशी उभे आहे. याला माझ्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्व आहे.

सिंधू जल करार केंद्र शासनाने रद्द केला. त्यावर पाकिस्तानने हा युद्ध करण्याचाच प्रकार आहे. त्याला उत्तर दिले जाईल असे पाकिस्तानचे मंत्री म्हणाले. त्याचीही भुजबळ यांनी खिल्ली उडवली. त्यातील नागरिकांनी पाकिस्तानच्या दहशतवादाचे चटके खूप सहन केले आहेत. निरपराध व्यक्तींना त्याची किंमत मोजावी लागली आहे. पाकिस्तानने आधी त्या दहशतवाद्यांना शोधून शिक्षा करावी, नंतर भारताला सल्ला देण्याच्या भानगडीत पडावे. आज सबंध भारत एक मुखाने दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात उभा आहे, हे पाकिस्तानने विसरू नये.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com