Dada Bhuse, Chhagan Bhujbal & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chhagan Bhujbal Politics: आता छगन भुजबळ मैदानात, नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा गुंता वाढणार की सुटणार?

Chhagan Bhujbal; Chhagan Bhujbal's swearing-in, will resolved issue of Guardian Minister or competition increase?-नाशिकच्या पालकमंत्री पदावर धावा करणारे छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.

Sampat Devgire

BJP Vs Chhagan Bhujbal News- रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न गेले काही महिने वादाचा विषय आहे. यामध्ये महायुतीतील तिन्ही घटक पक्ष त्यासाठी आग्रही आहे. आज छगन भुजबळ यांचा शपथविधी झाला. त्यामुळे त्यात आता मंत्री भुजबळ यांचाही दावा मजबूत झाला आहे.

नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष डोळे लावून बसला आहे. रायगडच्या पालकमंत्री पदी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांचे नाव जाहीर झाले होते. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी या पक्षाचे माणिकराव कोकाटे यांचे नाव आघाडीवर होते. त्यामुळे केले तीन महिने हा प्रश्न बिकट झाला होता.

आज छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. छगन भुजबळ यांनी प्रदीर्घकाळ नाशिकचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक पालकमंत्री पद आपलेच अशी अशा लावून बसले आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या शपथविधीने नाशिकच्या पालकमंत्री पदाचा क्रीडा सुटणार की आणखी बिकट होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला पालकमंत्री पद देण्यास शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने प्रखर विरोध केला होता. त्यामुळे प्रारंभी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाची घोषणा झाली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला आक्षेप घेतल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो निर्णय स्थगित करावा लागला होता.

पालकमंत्रीपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे माणिकराव कोकाटे ही नावे आघाडीवर होती. याबाबत त्यांनी जाहीर विधाने केली होती. मात्र कोकाटे यांना नंदूरबारचे पालकमंत्री करून त्याना स्पर्धेतून बाद करण्यात आले. भाजपचे पाच आमदार असूनही जिल्ह्यात मंत्रिपद मिळालेले नाही.

त्यामुळे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे आपणच पालकमंत्री असा दावा करत आले आहेत. प्रशासनासमवेत विविध बैठकाही त्यांनी घेतल्या आहेत. विशेषतः सिंहस्थ कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने राष्ट्रीय राजकारणात स्कोरिंग पॉईंट आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांकडूनही यंदाच्या कुंभमेळावर खास लक्ष देण्यात येणार आहे. त्यामुळे भाजप याबाबत ठाम दिसतो.

महायुतीतील तिन्ही पक्ष नाशिकचे पालकमंत्री पद आपलेच, या अपेक्षेने सध्या तरी निश्चित आहे. महायुतीचे मंत्री असो वा नेते अगदी मुख्यमंत्र्यांनाही कार्यकर्ते, प्रशासन आणि पत्रकारांनी पालकमंत्र्यांची घोषणा केव्हा या प्रश्नाने हैराण करून सोडले आहे. आता मंत्री भुजबळ यांचे समर्थक सक्रिय झाले आहेत. यात भाजप जिंकते की भुजबळ यांना लॉटरी लागते याची उत्सुकता आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT