Ajit Pawar & Chhagan Bhujbal
Ajit Pawar & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sharad Pawar resignation : अजित पवारांना राजीनाम्याची पूर्वकल्पना होती!

Sampat Devgire

Chhagan Bhujbal News : अर्धा कार्यक्रम सोडून मी न्यायालयात गेलो असता, तिथे मला समजले की शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्या वेळी मला धक्का बसला. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या राजीनामा दिला, त्या राजीनाम्याची पूर्वकल्पना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांना होती, असा गौप्यस्फोट पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. (Chhagan Bhujbal said Prafull Patel & Ajit pawar had pre information on resignation)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली होती. ती त्यांनी मागे घेतली. अद्यापही त्यावर विविध नवे विषय पुढे येत आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना याबाबत पूर्वकल्पना होती असा दावा केला आहे.

शनिवारी नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. श्री. भुजबळ म्हणाले, राजीनाम्याच्या घडामोडीत मी नव्हतो; परंतु अजित पवार व प्रफुल्ल पटेल यांना कल्पना होती. अचानक न्यायालयात काम आल्याने अध्यार्तून कार्यक्रम सोडून जावे लागले. त्याच ठिकाणी राजीनाम्यासंदर्भात समजल्यानंतर धक्का बसला.

ते म्हणाले, पवारांच्या राजीनाम्याला माझा विरोध होता. सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील विरोध केला. अध्यक्ष निवड समिती गठित केली. परंतु समितीला मान्य नसल्याने विरोध केला. माझी भूमिका मी त्या वेळी स्पष्ट केली होती. परंतु शरद पवार यांच्या राजीनाम्याची कल्पना कुटुंबातील नेत्यांना होती.

उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याबाबत बोलताना ते म्हणाले, की लोकांची भावना समजून घेतली पाहिजे. उद्योग आले पाहिजेत, पण त्याचा पर्यावरणाला किती धोका आहे, हेही तपासणे गरजेचे आहे. प्रकल्प जबरदस्तीने लादण्याची गरज नाही. समर्थन व विरोधात आंदोलन करू नये. एकमेकांना भिडण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे जात आहेत त्यांना माहिती मिळाली पाहिजे, त्यानंतर ते त्यांचे मत व्यक्त करतील.

वज्रमूठ सभा तहकूब

शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा रद्द झाली नसून उष्णतेमुळे वज्रमूठ सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. सातत्याने सभा घ्यायच्या का, हा विचारही पुढे आला. त्यामुळे निर्णय घेतल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT