Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपचा सुपडा साफ करावा : छगन भुजबळ

सरकारनामा ब्यूरो

बीड : ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाजप (BJP) सरकारसह मोदी (Narendra Modi) आणि देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) सडकून टीका केली आहे. तुम्हाला आरक्षण द्यायचे आहे की नाही? हे स्पष्ट करा असा थेट सवाल भुजबळ यांनी केंद्र सरकार आणि फडणवीसांना केला आहे.

छगन भुजबळ म्हणाले, मी फडणवीसांचे आभार मानतो. मात्र, त्यांना मला एक सांगायचे आहे, एकीकडे तुम्ही ओबीसी आरक्षणावरून भाजपकडून जनजागरण करता आणि दुसरीकडे तुम्ही कोर्टात जाता. भाजपचे धुळे जिल्ह्याचे सरचिटणीस हे कोर्टात गेले आहेत. यांना तुम्ही आवरणार आहेत की नाही? याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? तुम्हाला आरक्षण द्यायचे आहे की नाही हे सांगा, असा थेट सवाल त्यांनी फडणवीसांना केला.

याबरोबरच भुजबळ म्हणाले, भाजपचे जनजागरण दिल्लीत जाऊन मोदींसमोर करा आणि ओबीसींना घटनात्मक आरक्षण द्या आम्ही तेव्हा तुमचे आभार सुद्धा मानू, अश्या शब्दात त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. तसेच, कोर्टात तर आम्ही जाऊच मात्र, जनतेच्या कोर्टामध्ये आम्हाला न्याय द्यावा आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जनतेने भाजपचा सुपडा साफ करावा, असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

यावेळी त्यांनी आर्यन खान प्रकरणावर बोलतांना भाजपवर टीका केली. ते म्हणाले, जर येणाऱ्या काळात शाहरुख खानने भाजपात प्रवेश केला तर, त्या ड्रग्सची देखील पिठीसाखर होईल. अशी गंभीर टीका त्यांनी भाजपवर टीका केली, महागाईबर बोलतांना ते म्हणाले, आज सर्वच जीवनावश्यक वस्तू महागल्या आहेत. मोदींनी सांगितले होते, ना मै खाऊंगा ना खाणे दुंगा आता अगदी तसेच चालले आहे. मात्र, आता ही गाडी पुढे गेली आहे, ना मै खाऊंगा.. ना खाणे दुंगा.. ना गॅस पे कुछ पकाने दुंगा..असे म्हणत त्यांनी मोदींवर खोचक टीका केली.

त्याचबरोबर, घोटाळ्याच्या आरोपावरून यावेळी भुजबळ आक्रमक झाले होते. ते म्हणाले की, 100 कोटींच्या कामामध्ये कुणी 850 कोटी लाच देईल का? पाच फुटाची म्हैस गाबन राहिली आणि बाळंत झाली मग तिला 15 फुटाचे रेडकू होईल का? असा सवाल देखील भुजबळांनी यावेळी उपस्थित केला. आता धाडी पडत आहेत. 17 वेळा धाडी पडल्या. त्यावेळी लहान मुली-मुले घाबरायाचे, त्यावेळी माझी पत्नी लहान मुलांना घेऊन मॉलमध्ये दिवसभर जायची अशी खंत व्यक्त केली. तसेच, हम ना बदलेगे वक्त के साथ जब भी मिलेंगे अंदाज पुराणा होंगा! अश्या शायराणा अंदाजमधून भुजबळांनी मोदी सरकारला इशाराही दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT