आमदार कांदे खरे बोलतात की खोटे, याचा फैसला लवकरच!

नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) यांच्याकडे चौकशी अहवला सादर
Bhujbal- Kande
Bhujbal- KandeSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : शिवसेना आमदार सुहास कांदे (Suhas Kande) आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) यांची चौकशी आता स्वतः पोलिस आयुक्त दीपक पांडेय हे करणार आहेत. त्यामुळे या राज्यभर गाजलेल्या वादातून नेमके काय समोर येणार, याकडे लक्ष लागले आहे.

Bhujbal- Kande
भुजबळांविरोधात याचिका मागे घेण्यासाठी कांदे यांना धमकी ?; पाहा व्हिडीओ

आमदार सुहास कांदे यांनी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका करून खळबळ उडवून दिली होती. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर भुजबळ यांच्या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. भुजबळ हे निधीवाटपात गैरव्यवहार करत असल्याचा आरोप करून त्यांनी महाविकास आघाडीमध्ये ठिणगी टाकली होती. हा राजकीय वाद रंगलेला असतानाच दुसरीकडे त्यांनी आपल्याला अंडरवर्ल्डच्या धमक्या येत असल्याचे सांगून पोलिसांचेही टेन्शन वाढविले होते.

Bhujbal- Kande
सुहास कांदे यांच्यावर शंभर गुन्हे, ते आमदार कसे?

यानंतर कांदे यांना फोन करणारी व्यक्ती ही अक्षय निकाळजे असल्याचे स्पष्ट झाले. निकाळजे यांनी त्यानंतर कांदे यांच्यावर आरोप करत आपण धमकी दिल्या नसल्याचा दावा केला. पोलिसांनी त्यांना जबाबासाठी नाशिक येथे बोलवून घेतले. त्यांनी शक्तिप्रदर्शन करत नाशिकमध्ये एंट्री केली होती. पोलिसांनी कांदे आणि निकाळजे या दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. तसेच फोनवर या दोघांत काय संभाषण झाले, याचीही माहिती घेतली आहे. त्यातून अहवाल तयार केला असून तो पोलिस आयुक्तांकडे सादर केला आहे. पांडे आता या अहवालावर काय निर्णय घेतात, याची उत्सुकता असणार आहे.

Bhujbal- Kande
छगन भुजबळ- सुहास कांदे प्रकरण एवढं मोठं कसं झालं?

कांदे यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून पंकज भुजबळ यांचा पराभव केला. कांदे आणि भुजबळ यांचे राजकीय वाद जुनेच आहेत. मात्र महाविकास आघाडीचे सरकार असतानाही हा वाद थांबला नाही. कांदे यांनी या बाबी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचविल्या होत्या. पण त्यावर त्यांना काही सल्ले देण्यात आले. त्यानंतर त्यांचे भुजबळांवरील राजकीय हल्ले थांबले आहेत. या अहवालानंतर कांदे यांच्या दाव्यात पृष्टी मिळते की कांदे यांचा दावा खोटा ठरतो, याकडे आता लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com