Maharashtra politics : राष्ट्रवादी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्यभरातील मंत्री, आमदार आणि नेत्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. मात्र यादीत मंत्री छगन भुजबळ यांचे नाव वगळण्यात आले आहे. राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून मंत्री छगन भुजबळ यांचे नाव गायब असल्यानं राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आधीत राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतले अजित पवार यांच्यासह सुनिल तटकरे,धनंजय मुडे, माणिकराव कोकाटे यांच्यासह तब्बल ४० जणांची नावे आहेत. परंतु यात छगन भुजबळ यांचे नाव वगळ्यात आले आहे. त्यांच्याऐवजी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचे या यादीत नाव आहे.
त्यामुळे लोकसभा व विधानसभेनंतर आता स्थानिकच्या निवडणुकीतही छगन भुजबळ यांना प्रचारापासून दूर ठेवले जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. महायुतीच्या मंत्रीमंडळातही पहिल्या टप्प्यात भुजबळांना स्थान मिळालं नव्हतं. भुजबळांनी मराठा आरक्षणाला विरोध करुन एकतर्फी ओबीसींची बाजू घेतल्याने पक्षनेतृत्व त्यांच्यावर नाराज होते. परंतु त्यानंतर भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जवळ करत भुजबळांनी मंत्रीपद पदरात पाडून घेतलं.
आता पुन्हा स्थानिक निवडणुकांमध्ये स्टार प्रचारकांच्या यादीतून पक्षाने त्यांचे नाव वगळ्याने त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आल्याचे बोलले गेले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना स्वत: व्हिडीओ बनवून त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. तटकरे म्हणाले, छगन भुजबळ हे नेहमीच आमचे स्टार प्रचारक राहिले आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा तसेच मूल्यांचा आम्ही अत्यंत सन्मान करतो. मात्र यावेळी त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव ते प्रचारासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत श्री. समीर भुजबळ हे प्रचाराची जबाबदारी सांभाळतील आणि भुजबळ साहेबांची निष्ठा, मूल्ये व विचार यांचे प्रतिबिंब जनतेपर्यंत पोहोचवतील.
तटकरे म्हणाले, भुजबळांवर शस्रक्रिया झाल्याने ते उपचार घेत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक महिना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव आपण स्टार प्रचारकांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश केला नाही. भुजबळ साहेब हे केवळ राज्याचे नाही तर देशाचे पक्षाचे स्टार प्रचारक आहेत. केवळ प्रकृती अस्वास्थाच्या मुळेच त्याचं नाव वैद्यकीय सल्ल्यानुसार घेण्यात आलेले नाही. त्यामुळे काहीजण यासंदर्भात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतील परंतु ते चुकीचे आहे. कुणीही यासंदर्भात गैरसमज करु नका असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.