Chhagan Bhujbal, Rajabhau Waje, Hemant Godse Saarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Lok Sabha 2024 Result : भुजबळ यांनी केला 'गेम'! गोडसेंना बसवले घरी; यंदा वाजेंची दिल्लीवारी ?

Sampat Devgire

Nashik Rajabhau Waje : नाशिक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे एक लाखाहून अधिक मतांनी आघाडीवर आहे विद्यमान खासदार गोडसे यांना त्यांनी घरी बसवले.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी कापण्यात खासदार गोडसे यशस्वी झाले होते. मात्र निवडणुकीच्या आजच्या मतमोजणीत भुजबळ गोडसे यांचे दिल्लीच्या विमानाचे तिकीट कापण्यात यशस्वी झाल्याचे दिसते. मतमोजणीत गोडसे यांच्या वाट्याला आलेले मतदान पाहता त्यांना यंदा घरी बसावे लागेल असे चित्र आहे. भुजबळ यांच्याशी घेतलेल्या पंगा त्यांना महागात पडला अशी चर्चा आहे. यांचा गेम करण्यात भुजबळांचे डावपेच यशस्वी ठरले असे बोलले जात आहे.

या निवडणुकीत प्रारंभी वाटणारी चुरस संपली आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे गटावर मोठी आघाडी घेतली आहे. मतमोजणीत तेराव्या फेरी अखेर वाजे यांनी एक लाख ४७ हजार मतांची आघाडी घेतली आहे. प्रत्येक फेरीत वाजे मोठी आघाडी घेत आहे. त्यामुळे नाशिकचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे.

वाजे यांना प्रत्येक फेरीत सरासरी दहा हजार पाचशे मतांची आघाडी मिळत आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आता चांगलेच पिछाडीवर गेले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या वाजे यांची गाडी सुसाट निघाली आहे. त्या तुलनेत गोडसे मात्र उभे राहतील अशी चिन्हे आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT