Chhagan Bhujbal News: लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातील तील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणातही तीला तेव्हढेच महत्व दिले जाते. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघात ती आहे. या समितीचा सभापती आणि उपसभापती येत्या ११ एप्रिलला ठरणार आहे.
लासलगाव बाजार समितीचे राजकारण निफाड आणि येवला या दोन मतदारसंघांसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी अनेक नेते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात. सध्या या बाजार समितीत माजी मंत्री छगन भुजबळ आणि पंढरीनाथ थोरे या दोघे एकत्रीतपणे सत्तेत आहे.
या निवडणुकीत व्यापारी आणि अडते गटातील ज्ञानेश्वर गांगुर्डे यांनी निवडणुकीला आक्षेप घेतला होता. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमुळे गेले चार महिने सभापतीपदाची निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यामुळे सभापती पदाची निवडणूक व्हावी यासाठी अनेकांनी देव पाण्यात बुडवले होते
यासंदर्भात रोटेशन नुसार सभापतीपदाची संधी असलेल्या भाजपचे डी. के. जगताप उर्फ नाना यांनी उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. व्यापारी, आडते गटातील मतदानाच्या वादाचा सभापतीपदाच्या निवडणुकीची संबंध नाही. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी केली होती.
या संदर्भात येथे ११ एप्रिलला बाजार समितीच्या सभापती, उपसभापती आणि अन्य निकालांबाबत निर्णय होईल. यावेळी छगन भुजबळ गटाचे श्रीकांत आवारे उपसभापती तर भाजपचे डी. के. जगताप हे सभापती होतील असे संकेत आहेत. यामध्ये माजी मंत्री भुजबळ यांची महत्त्वाची भूमिका असेल.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने निफाड आणि येवला मतदारसंघाचे राजकारण ढवळून निघाले होते. यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर अचानक चर्चेत आला होता. त्यामुळे भुजबळ यांच्या मार्गात राजकीय अडथळे निर्माण झाले. त्याचे बाजार समितीतील काही संचालक मराठा म्हणून विरोधात गेले होते. विरोधी गटातील डी. के. जगताप व अन्य काही परस्पर विरोधी मंडळी एकत्र आली होती.
विधानसभा निवडणुकीतील या राजकीय उलथापालथीचा परिणाम लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदावर होणार आहे. मात्र माजी मंत्री भुजबळ यांनी यातील दुरावलेल्या संचालकांनाही मॅनेज करण्याचे कसब यापूर्वी दाखवले आहे. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजार समितीचा सभापती, उपसभापती ठरविण्यात माजी मंत्री भुजबळ महत्त्वाची भूमिका बजावतील.
------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.