Valmik Karad Attack Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला बीड कारागृहात मारहाण झाली होती. त्यानंतर कारागृह प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आले होते. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याची बीड जिल्ह्यातील प्रशासनावर पकड आहे. त्याचा प्रत्येक पुन्हा एकदा येऊ लागला आहे. गुन्हेगारीच्या स्पर्धेतून वाल्मीक कराड यांच्याशी शत्रुत्व असलेल्या गीते गँगकडून कराड आणि सुदर्शन घुले याच्यावर हल्ला केला होता. बीडच्या करागृहात झालेल्या हल्ल्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.
यानंतर कारागृह प्रशासनाने तातडीने पावले उचलली. वाल्मीक कराड याचे अक्षय आठवले आणि महादेव गीते या दोन्ही टोळ्यांशी वर्चस्ववादातून शत्रुत्व आहे. या वादातूनच बीड कारागृहात हा हल्ला झाल्याचा दावा केला जातो.
त्यानंतर महादेव गीते आणि त्याच्या सहकाऱ्यांना कारागृह प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर कारागृहात हलवले होते. ही कारवाई वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून झाल्याचा आरोप गीते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता.
त्यानंतर लगेचच सध्या मकोका अंतर्गत बीड कारागृहत असलेल्या अक्षय आठवले गॅंगवरही कारवाई झाली. कारागृह प्रशासनाने त्यांना तातडीने नाशिकच्या कारागृहात हलवले.यापूर्वी महादेव गिते व त्याच्या सहकाऱ्यांनी वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून आम्हाला हलविले जात आहे, असा आरोप केला होता.
वाल्मीक कराड आणि त्याच्याशी संबंधित टोळीतील गुन्हेगारांवर बीडचे प्रशासन खास मेहरनजर दाखवीत असल्याचा आरोप होत आहे. बीडच्या कारागृहात वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची बडदास्त ठेवली जाते. राजकीय वरदहस्त असल्याने तो वादाचा विषय होता.
रविवारी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण झाली. त्यानंतर लगेचच प्रशासनाने खबरदारी म्हणून वाल्मीक कराड यांच्याशी शत्रुत्व असलेल्या गीते आणि आठवले गॅंगला अन्य कारागृहात हलवले आहे. त्यामुळे कारागृहाचा हा कारभार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.